सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले. अकोला येथील खासगी इस्पितळात उपचारादरम्यान ३१ जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांनी शासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले असून, ही चिठ्ठी बुधवारी त्यांच्या मृत्यूनंतर सापडली.मृतक हरिदास इंगळे यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे. या शेतात त्यांनी शासनाच्या विशेष घटक योजनेंतर्गत विहीर खोदून वर्षभरापूर्वी सौर कृ षी पंपाचा लाभ घेतला. त्याद्वारे त्यांनी शेतात उत्पादन घेणे सुरू केले; परंतु निसर्गाने वेळोवेळी साथ सोडल्याने सतत नापिकी व उत्पादनात घट होत गेली. त्यांनी याच शेतीच्या भरवशावर मुलींचे थाटामाटात लग्न केले व मुलाच्या शिक्षणासह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. अशातच मायक्रोफायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते. या चिंतेने त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतक हरिदास इंगळे हे कोणत्याही सामाजिक कार्यात सहकार्य करीत असत. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. ते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी अनेक वादांचे निवारण केले. समाजात एकजूट ठेवून सलोखा कायम ठेवण्याचा सल्ला ते नेहमी देत होते. त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याने अनेकांची मने सुन्न झाली होती. मुलींनी व मुलाने आक्रोश करून हंबरडा फोडला.
कर्जबाजारीपणासाठी शासनाला दोषी ठरवत अल्पभूधारक शेतकरी कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 6:39 PM
सायखेड (जि. अकोला): शासनाने आपल्या समस्यांची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे निराश झाल्याने आपण जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून बार्शीटाकळी तालुक्यातील चोहोगाव येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाचे प्रमुख हरिदास रतन इंगळे (५७) यांनी २६ जानेवारी रोजी राहत्या घरी विष प्राशन केले.
ठळक मुद्देसरकाने दखल न घेतल्याने कर्जबाजारी झाल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.मृतक हरिदास इंगळे यांच्या पत्नीच्या नावे चोहोगाव शिवारात एक एकर शेती आहे.मायक्रोफायनान्स कंपनीचे थकीत कर्ज, इतर खासगी कर्जामुळे ते चिंतित होते.