रस्त्याच्या उत्खननातून निघालेली माती शेतात टाकल्याने शेतकरी संतापले! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 07:33 PM2018-03-23T19:33:53+5:302018-03-23T19:33:53+5:30

हातरुण(जि.अकोला ) : खामगाव ते अकोट रस्त्याचे निंबा फाटा मार्गे चौपदरीकरण होत असताना जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून माती शेतात टाकण्यात आली आहे.

Farmers are angry because of throwing soil in their fields | रस्त्याच्या उत्खननातून निघालेली माती शेतात टाकल्याने शेतकरी संतापले! 

रस्त्याच्या उत्खननातून निघालेली माती शेतात टाकल्याने शेतकरी संतापले! 

googlenewsNext
ठळक मुद्देखोदकाम करीत असताना रस्त्याच्या बाजूने असलेल्या शेतात मातीचा ढीग चे ढीग लावण्यात येत आहेत. हजारो ब्रास माती थेट शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने पेरणीपूर्व मशागतीचे काम कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. माजी आमदार गव्हाणकर यांनी निंबा फाटा ते आडसुल पर्यंत या जमेची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

हातरुण(जि.अकोला ) : खामगाव ते अकोट रस्त्याचे निंबा फाटा मार्गे चौपदरीकरण होत असताना जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या बाजूने खोदकाम करून माती शेतात टाकण्यात आली आहे. यामुळे शेतात जाण्याचा रस्ता बंद पडल्याने उन्हाळ्यात करण्यात येणारी शेती मशागतीची कामे ठप्प पडल्याने शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांचा हा प्रश्न निर्माण झाल्याने माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या कामाची पाहणी केली. सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उद्या या विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन माजी आमदार गव्हाणकरांनी शेतकऱ्यांना दिले.
  रस्त्याचे जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात येत आहे. खोदकाम करीत असताना रस्त्याच्या बाजूने असलेल्या शेतात मातीचा ढीग चे ढीग लावण्यात येत आहेत. हजारो ब्रास माती थेट शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आल्याने पेरणीपूर्व मशागतीचे काम कसे करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. ही समस्या अंदूरा येथील शेतकरी संजय घंगाळे यांनी माजी आमदार गव्हाणकर यांना सांगून शासनदरबारी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. माजी आमदार गव्हाणकर यांनी निंबा फाटा ते आडसुल पर्यंत या जमेची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी २०० शेतकरी हजर होते. 
  अंदुरा येथील शेतकरी संजय घंगाळे यांचे शेत अंदुरा ते निंबा फाटा मार्गावर असून यांच्या शेतातील झाडाची कत्तल करण्यात आली. तसेच त्यांच्या शेतात माती टाकण्यात आल्याने लाख मोलाची शेतजमिनीची नासधूस करण्यात आली. याप्रकारामुळे रस्त्याच्या कडेने शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी निंबा फाटा येथे एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला. शेतकरी संतापलेले असतांना संबधित अधिकाऱ्यांनी या कामाची साधी पाहनीही जेली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांत होत आहे. अंदूरा ते कारंजा मार्गावर पानकास नदीवर पुर आल्यावर शेतात पाणी जात असल्याने रस्त्याच्या उंचीनेच सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता. आता यावेळी या सिमेंट रस्त्याच्या बाजूने उंच रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी उंच रस्ता तयार झाल्यास दरवर्षी पावसाळ्यात पुराचे पाणी थांबून शेती मोठ्या प्रमाणात खरडून जाणार आहे. ही समस्या शेतकऱ्यांनी माजी आमदार गव्हाणकर यांना शेतकऱ्यांनी सांगितली. यावेळी संजय घंगाळे, राजेंद्र बेंडे, गजानन चितोडे, रुपेश आहिर, संजय अग्रवाल, अक्षय नागोलकर,  प्रमोद रोहनकार, प्रशांत बेंडे, पवन विंचू, मुकुंद कुलकर्णी, सहदेव भोजने, अविनाश बोरवार, गणेश भोजने, रामकृष्ण बोरवार, यांच्यासह शेतकरी हजर होते.

Web Title: Farmers are angry because of throwing soil in their fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.