शेतकऱ्यांना खते, बियाणे घरपोच देणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:11 AM2020-04-28T10:11:44+5:302020-04-28T10:11:53+5:30
कृषी विभाग बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके, शेतकºयांच्या घरपोच देणार आहे.
- राजरत्न सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खरीप हंगाम तोंडावर आला असून, पुढच्या महिन्यात रोहिणी नक्षत्राला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घालमेल सुरू आहे. टाळेबंदी वाढल्यास काय करावे, असा विचार त्यांच्या मनात सुरू आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास कृषी विभाग बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके, शेतकºयांच्या घरपोच देणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.
देशात लावलेल्या टाळेबंदीला ३५ दिवस पूर्ण होत आहेत; परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने टाळेबंदी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच अनुषंगाने शेतकºयांना बी-बियाणे, खते थेट घरी पोहोचता येतील का, यावर कृषी विभागाचे मंथन सुरू आहे. राज्यात १ कोटी ३२ लाख हेक्टरवर विविध पिकांची पेरणी केली जाते. यामध्ये सोयाबीन आणि कापूस ही दोन पिके सर्वात जास्त घेतली जातात. या दोन पिकांचे राज्यात जवळपास ८० लाख हेक्टर क्षेत्र आहे विदर्भात कापसाचे क्षेत्र १८ लाख हेक्टर आहे तर तेवढेच क्षेत्र सोयाबीनचे आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी ४ लाख २५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची तजवीज केली आहे. तथापि, यातील किती बियाणे उगवणशक्ती परिणामकारक ठरतात, यावर सर्व अवलंबून आहे. यावर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने नांदेड -४४ आणि पीकेव्ही हायब्रीड २ या बियाण्याची जवळपास ८० हजार पाकिटे तयार ठेवली आहेत. ही बियाणे शेतकरी बचत गटामार्फत शेतकºयापर्यंत पोहोचविता येईल का, याचे नियोजन सुरू आहे. असे असले तरी खासगी कंपन्यांचे बियाणे शेतकºयांपर्यंत कसे पोहोचता येईल, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
या दृष्टीनेही विचार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रत्येक गावातील रासायनिक खतांची मागणी नोंदवून त्या गावात खताचा ट्रक पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेतकºयांना आगोदर पैसे भरून मागणी नोंदवावी लागणार आहे. बियाणे घरपोच पोहोचविण्यासाठीचे नियोजन सुरू आहे; परंतु शेतकºयांना वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे हवे असते. त्यांची ही मागणी बघून बचत गटामार्फत घरपोच बियाणे पोहोचविण्यावर विचार सुरू आहे.
बियाणे खरेदी करताना गर्दी होऊ नये, फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषी अधिकाºयांची बैठक घेतली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भाजीपाला, फळे बचत गटामार्फत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर बियाणे, कीटकनाशके, शेतकºÞयांना घरपोच करण्यात येणार आहेत.
टाळेबंदी वाढल्यास रासायनिक खते शेतकºयांना घरपोच पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकºयांना अगोदर पैसे भरून मागणी नोंदवावी लागेल. बियाणे शेतकरी बचत गटामार्फत पोहोचविण्यासाठीचे नियोजन सुरू आहे.
- सुभाष नागरे, संचालक, बियाणे,खते, पुणे.
सुरक्षित अंतर!