बल्हाडी येथे किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:46 AM2021-01-13T04:46:14+5:302021-01-13T04:46:14+5:30

खेट्री/चान्नी : बाळापूर तालुक्यातील तसेच चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बल्हाडी येथे किरकोळ कारणाच्या वादातून दोन गटात लाठ्याकाठ्या ...

Fighting between two groups over a minor dispute at Balhadi | बल्हाडी येथे किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

बल्हाडी येथे किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी

Next

खेट्री/चान्नी : बाळापूर तालुक्यातील तसेच चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बल्हाडी येथे किरकोळ कारणाच्या वादातून दोन गटात लाठ्याकाठ्या व दगडाने हाणामारी झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत काही जण जखमी झाले असून, काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. बल्हाडी येथे किरकोळ कारणावरून एका विवाहित महिलेने कोरड्या विहिरीत उडी घेतल्याची घटना शुक्रवारी घडली होती. गावातील प्रतिष्ठित लोकांनी त्या दोन्ही गटाच्या लोकांची समजूत काढून सदर प्रकरण गावातच मिटविले होते, परंतु ताे वाद शनिवारी सायंकाळी पुन्हा उफाळून आला व दोन्ही गटात लाठ्याकाठ्या व दगडाने हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटातील काही जण जखमी झाले असून, काही गाड्यांची तोडफोड झाली आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील जखमी व त्यांच्या नातेवाइकांनी थेट चान्नी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील फिर्यादींची तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत पोलिसात याप्रकरणी गुन्ह्याची नाेंद झाली नव्हती.

Web Title: Fighting between two groups over a minor dispute at Balhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.