अखेर 'हमसफर एक्स्प्रेस'ला अकोल्यात मिळाला थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 02:20 PM2019-02-15T14:20:37+5:302019-02-15T14:20:56+5:30

अकोला : पुणे-नागपूर आणि पुणे-अजनी दोन साप्ताहिक हमसफर सुपरफास्ट रेल्वे एक्स्प्रेसला अखेर अकोल्यात थांबा मिळाला आहे.

Finally, the 'Hamsafar Express' was available in Akola | अखेर 'हमसफर एक्स्प्रेस'ला अकोल्यात मिळाला थांबा

अखेर 'हमसफर एक्स्प्रेस'ला अकोल्यात मिळाला थांबा

googlenewsNext

अकोला : पुणे-नागपूर आणि पुणे-अजनी दोन साप्ताहिक हमसफर सुपरफास्ट रेल्वे एक्स्प्रेसला अखेर अकोल्यात थांबा मिळाला आहे. रेल्वे मंत्रालयाने नव्याने सुरू केलेल्या या दोन्ही रेल्वेगाड्यांना थांबा नसल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशझोतात आणले होते. या वृत्ताची दखल अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि उद्योजक वसंत खंडेलवाल यांनी घेतली. हमसफर एक्स्प्रेसला अकोला आणि वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे झाल्यानंतर या गाडीला थांबा मिळाला.
पुणे-नागपूर आणि पुणे-अजनी दोन्ही साप्ताहिक हमसफर सुपरफास्ट एक्स्प्रेस आठवड्याच्या दर गुरुवारी आणि शनिवारी सुरू होत आहेत. शनिवारपासून या दोन नव्या रेल्वेगाड्या पुण्याहून धावणार आहेत. या दोन्ही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पंधरवड्यापूर्वीच जाहीर झाले होते. नव्याने सुरू होणाऱ्या ११४१९/११४२० पुणे ते नागपूर आणि ११४१७/११४१८ पुणे ते अजनी या दोन साप्ताहिक हमसफर रेल्वेगाड्यांना दौंड, मनमाड, भुसावळ आणि बडनेरा या चार स्थानकांवर थांबा दर्शविण्यात आला होता. अकोला मार्गे धावणाºया दोन्ही रेल्वेगाड्यांना अकोल्यात थांबा नसल्याने अकोलेकरांचा हिरमोड झाला होता. अकोला रेल्वेस्थानकावर दोन्ही गाड्यांना थांबा नसल्याने या गाड्यांचा लाभ अकोलेकरांना मिळणार नाही. देशातील रेल्वे आरक्षणातील प्रमुख १०० स्थानकांमध्ये अकोला स्थानक असले तरी थांब्यामध्ये मात्र अकोल्याला स्थान नाही. अशा आशयाचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रकाशझोतात आणले. त्या वृत्ताची गंभीर दखल अकोल्याचे खासदार संजय धोत्रे आणि उद्योजक वसंत खंडेलवाल यांनी घेतली. दोघांनीही यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गुरुवारी भुसावळ रेल्वे विभाग आणि अकोला रेल्वेस्थानकावर थांबा मिळाल्याचा मेल धडकला.

 

Web Title: Finally, the 'Hamsafar Express' was available in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.