अकोट-अंजनगाव या राष्ट्रीय महामार्ग ३६ वर पथदिवे मंजूर झाले होते. परंतु त्यातील केवळ २५ पथदिवेच लावण्यात आले होते. या मार्गावरून आजुबाजूच्या खेड्यावरील विद्यार्थी, मजूर व फिरायला जाणाऱ्या महिला व पुरुषांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे हे पूर्ण पथदिवे लागणे महत्त्वाचे होते. शिवसैनिक राजेश हेड, उमेश दाभाडे, प्रशांत नाठे, दिवाकर भगत, बंडू उमक, धम्मदीप इंगळे, रोहित दांडगे, प्रशांत हेड, शुभम दामधर, आतिक भाई, वासुदेव भोंडे, पवन राऊत, देवानंद गवारगुरू, प्रदीप तेलगोटे, गोपाल रेखाते यांनी ही बाब शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रा. माया म्हैसने यांच्या लक्षात आणून दिली. माया म्हैसने यांनी पाठपुरावा करून नॅशनल हायवेच्या सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व वादाच्या भोवऱ्यात सापडलेले हे पथदिवे सुरू करून घेतले. या पथदिव्यांचे उदघाटन प्रा. सौ. माया म्हैसने व सर्व शिवसैनिकांनी केले.
फोटो: