घराला आग; लाखोंचे साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 04:59 PM2019-11-01T16:59:16+5:302019-11-01T16:59:21+5:30
अन्न धान्य व इतर साहित्य जळून खाक झाल्यामुळे ताले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
खेट्री/चान्नी : येथील अल्पभूधारक शेतकरी किसन वासुदेव ताले यांच्या घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजीच्या दुपारी घडली या आगीमध्ये किसन वासुदेव ताले यांच्या घरातील सोन्याचे दागिने, फ्रिज, कुलर, टीव्ही, कपाट, कपडे, कागदपत्र, लोखंडी पेटी, १० क्विंटल सोयाबीन, अन्न धान्य व इतर साहित्य जळून खाक झाल्यामुळे ताले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. किसन वासुदेव ताले, दरोजी प्रमाणे घराला कुलूप लावून कुटुंबासह शेतात मजुरी करण्यासाठी गेले असता, शुक्रवारी दुपारी अचानक घराला आग लागल्याचे वृत्त गावात वाऱ्यासारखे पसरताच गावातील ग्रामस्थांनी ताले यांच्या घरी धाव घेतली आणि आग विजवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत ताले यांच्या घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले होते. यामध्ये किसन वासुदेव ताले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून ते हवालदिल झाले आहे. आग लागल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच याबाबतची माहिती महसूल विभागांना देण्यात आली आहे. सदर आगीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याची मागणी किसन वासुदेव ताले यांनी केली आहे.