आकोट येथे शेतातील झोपडीला आग; एक बैल ठार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 04:44 PM2019-04-28T16:44:32+5:302019-04-28T16:44:58+5:30

अकोटः अकोट शहराचा एक भाग असलेल्या नंदिपेठ परिसरात शेतातील झोपडीला 28 एप्रिल रोजी दुपारी आग लागली या आगीत संपूर्ण झोपडी बेचिराख झाली आहे.

A fire in a hut in Akot; Killed a bull | आकोट येथे शेतातील झोपडीला आग; एक बैल ठार  

आकोट येथे शेतातील झोपडीला आग; एक बैल ठार  

googlenewsNext

अकोटःअकोट शहराचा एक भाग असलेल्या नंदिपेठ परिसरात शेतातील झोपडीला 28 एप्रिल रोजी दुपारी आग लागली या आगीत संपूर्ण झोपडी बेचिराख झाली आहे. या घटनेने कुटुंब बालबाल बचावले असून एक बैल मात्र मृत्युमुखी पडला आहे.

     नंदिपेठ भागातील सुमती गणेश रंधे यांच्या शेतात असलेल्या झोपडी प्रविण प्रभाकर रंधे हे कुटुंबीय राहते. या झोपडीला अचानकपणे आग लागली. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत  अग्निशमन दलाच्या सहकार्याने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या आगीत संपूर्ण झोपडीची राखरांगोळी झाली आहे. आगीत घरातील अन्नधान्य संसारोपयोगी वस्तू जनावरांचा चारा व शेतीचे अवजार जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये एक बैल गोरा सुद्धा मृत्युमुखी पडला आहे. घरातुल गँस सिंलेडर  घराबाहेर फेकल्याने या घटनेतून प्रवीण प्रभाकर रंधे यांच्या कुटुंबातील चार सदस्य बाल-बाल बचावले आहे. संपूर्ण घर जळून खाक झाल्याने हे कुटुंब निराधार झाले. या आगीत जवळपास 1लाख 82 हजार नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी दिनेश मोहोकार व विशाल शेरेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पंचनामा केला. पंचनामा व सविस्तर अहवाल अकोट तहसीलदार गिते यांना सादर करण्यात आला आहे.अचानक आगीचे कारण समजु शकले नाही.

Web Title: A fire in a hut in Akot; Killed a bull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.