अकोला: रविवारी मान्सूनचा पहिलाच दमदार पाऊस झाल्याने अकोलेकरांना दिलासा मिळाला; पण याच पावसात सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेचे धिंडवडे निघाले. रुग्णालय परिसरातील गटारात शिळ््या अन्नाचा खच अन् परिसरातील अस्वच्छतेमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. हा प्रकार रुग्णांसह डॉक्टर अन् कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयात अस्वच्छता आणि त्यामुळे पसरणारी दुर्गंधी ही नेहमीच असते; परंतु ऐन पावसाळ््याच्या दिवसात ही अस्वच्छता रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी घातक ठरू शकते. असे असले तरी पावसाळ््यात येथील अस्वच्छतेचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत वाढलेले दिसून येते. रविवारी झालेल्या पाहिल्याच पावसात हे वास्तव निदर्शनास आले. वॉर्ड क्रमांक सहाकडे जाणाºया मार्गावर पाणी साचले असून, काहींनी येथेच लघुशंका केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथून बालरुग्ण विभागाकडे जाताना खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात शिळे अन्न टाकून देण्यात आल्याचे निदर्शनास आले. हे खाद्यपदार्थ पावसात भिजल्याने सर्वत्र दुर्गंधी व माशा पसरल्या आहेत. रुग्णालय व परिसरातील अस्वच्छता रुग्णांसोबतच डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.येथे फेकल्या जाते शिळे अन्नरुग्ण व त्यांचे नातेवाईक शिळे झालेले अन्न बालरुग्ण विभाग परिसरातील खुल्या जागेत फेकून देतात. या परिसराची स्वच्छता कधीच करण्यात येत नसल्याने येथे शिळ््या अन्नाचा खच लागला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माशांची उत्पत्ती झाली आहे.सेफ्टिक टँक लिकेजसर्वोपचार रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील स्वच्छता गृहाचे सेफ्टिक टँक लिकेज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सेफ्टिक टँकच्या लिकेजमुळेदेखील परिसरात दुर्गंधी पसरली आहे.अस्वच्छतेतच करावे लागते भोजनसर्वोपचार रुग्णालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना भोजन करण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरातील अस्वच्छतेमध्येच त्यांना भोजन करावे लागते. हा प्रकार त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.