अकोला: कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक लागण ४५ ते ७५ वयोगटामध्ये झाली होती, परंतु दुसऱ्या लाटेत १६ ते ४५ वर्ष वयोगटात मोठ्या प्रमाणात कोविड संसर्ग झाल्याचे दिसून आले. दुसऱ्या लाटेत सुमारे २२ हजारांपेक्षा जास्त तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. यावरुन पहिली लाट ज्येष्ठांना, तर दुसरी लाट तरुणांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे. दोन्ही लाटेत मात्र, ५१ वर्षावरील वयाेगटात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोना विषाणूमुळे घरातील कर्त्या पुरुषांचाच बळी गेल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह वयोगट
वयोगट - पहिली लाट- दुसरी लाट
० ते १५ - ६५८ - ७६९
१६ ते ३० - १२१ - १०,९१३
३१ ते ४५ - १५८४ - ११२०९
४६ ते ६० - १८४२ - १०५६८
६१ ते ७५ - ३६७६ - ७४२०
७६ ते ९० - ३३४२ - ३८८५९१ पेक्षाजास्त- ४३४ - ३२३
वयोगटानुसार मृत्यू
वयोगट - पहिली लाट - दुसरी लाट
० ते १५ - - ००
१६ ते ३० - ४ - ३९
३१ ते ५० - ७० - २३२
५१ व त्यावरील- २६२ - ५००
मृत्यू
पहिली लाट - ३३६
दुसरी लाट - ७७१
संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी
राज्यासह जिल्ह्यातही तिसऱ्या लाटेचा धाेका वर्तविण्यात येत आहे.
संभाव्य तिसरी लाट लहान बालकांसाठी घातक असल्याचे सांगितले जात आहे.
त्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स गठित करण्यात आली आहे.
तालुका निहाय खाटांचे नियोजन करण्यात आले असून, त्यामध्ये बालकांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
पहिल्या लाटेत ज्येष्ठांना, तर दुसऱ्या लाटेत तरुणांना कोविडचा जास्त फटका बसल्याचे निदर्शनास आले. संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आवश्यक तयारी केली जात आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला