अकोला : पिकांवरील किडीचे व्यवस्थापन करण्यासाठी महाराष्टÑ कृषी आद्योगिक विक ास (एमएआयडीसी) महामंडळातर्फे एका कामगंध गोळ्यांच्या पॅकिंगऐवजी पाच ते सहा गोळ्या असलेल्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतात लावण्यासाठी एक किंवा दोन गोळ्यांची गरज असते; परंतु सध्या त्यांना पाच ते सहा गोळ्या खरेदी कराव्या लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.विविध पिकांवरील किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतात कामगंध सापळे लावण्यासाठीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. हा नैसर्गिक उपाय असल्याने अलीकडच्या एक-दोन वर्षांत कामगंध सापळ्यांची मागणी वाढली आहे. यावर्षी तूर व सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी कामगंध सापळे लावण्यात येत आहे. नर किडींना आकर्षित करण्यासाठी सापळ्यामध्ये (हेलीकोवर्पा आर्मीजेरा) कामगंध गोळी लावावी लागते. या गोळ्यांचा पुरवठा करण्यासाठीच्या निविदा ‘एमएआयडीसी’तर्फे काढण्यात आल्या आहेत. यानुसार एका पाकिटात एक गोळ्ीचा अंतर्भाव असणे गरजेचे होते. तथापि, पाच ते सहा गोळ्यांचे पाकीट असलेल्या कामगंध गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. एका पाकिटाची किंमत २५ रुपये आहे.तथापि, एकाच पाकिटातील सहा गोळ्यांसाठी शेतकºयांना २५ पेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत असल्याचा आरोप होत आहे.
एका पाकिटात एकच (हेलीओवर्पा आर्मीजेरा) कामगंध गोळी असणे अनिवार्य आहे. एकापेक्षा अधिक गोळ्यांचे पाकीट असेल, तर त्याची चौकशी करण्यात येऊन सुधारणा करण्यात येईल. शेतकºयांना फायदा व्हावा, या उद्देशाने आमचे काम सुरू आहे.सत्यजित ठोसर,प्रादेशिक व्यवस्थापक,एमएआएडीसी.अकोला.