सध्या शेवंती बहराला आहे. त्यामुळे शेवंतीचे विविध रंगी, आकारांचे ताटवे ओळीने बहरून आले आहेत. हे दृष्य नयनरम्य ठरतेय. सोबतच गुलाब, बिजली, एस्टर, निशिगंध असे विविध प्रकारांच्या फूल पिकांची लागवड करून त्यांच्या विविध जाती विकसित करण्याचे काम येथे केले जाते. त्यावर संशोधन केले जाते. या केंद्रात शेवंतीचे पाच रंगांमध्ये १००हून अधिक प्रकार उपलब्ध आहेत. रागिणी नावाचं स्वतंत्र वाणही विकसित केलंय. गुलाबाच्या १५०हून अधिक प्रकार, जाती आहेत. ग्लॅडीओलसचे ५० प्रकार आहेत. निशिगंधाच्या १२ जाती आहेत. मोगऱ्याच्या आठ, कुंदाच्या सहा, अबोलीच्या पाच, झेंडूचे तीन, दहेलियाच्या १३० प्रकार आहेत. याशिवाय विविध प्रकारचे सावलीत लावता येणारी शोभेची रोपे, शोभेचे निवडूंग, कमी जागेत विकसित करण्यासाठी व्हर्टिकल गार्डनसाठी लागणारे रोपे, प्रांगणे सुशोभित करण्यासाठी लागवड करावयाच्या हिरवळीचे सात प्रकार येथे उपलब्ध आहेत. अकोला जिल्ह्यातील तसेच संलग्न जिल्ह्यातील शेतकरी येथे येऊन मार्गदर्शन घेत असतात. येथील रोपवाटिकेतून रोपांची विक्रीही केली जाते, अशी माहिती या विभागातून देण्यात आली.
कृषी विद्यापीठाच्या प्रांगणातील फूलशेतीला बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:14 AM