वन अधिका-यांना मारहाण
By admin | Published: August 4, 2016 12:50 AM2016-08-04T00:50:15+5:302016-08-04T00:50:15+5:30
प्रतिबंधित क्षेत्रात मेंढय़ा चराईस मनाई केल्यान वाद.
खामगाव (जि. बुलडाणा) : मेंढय़ा चारण्यास मनाई केल्यामुळे मेंढपाळांनी वन अधिकार्यास मारहाण केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी ढोपरगाव येथे घडली. याप्रकरणी वनअधिकार्यांच्या फिर्यादीवरुन पिं.राजा. पोलिसांनी मेंढपाळांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
उपप्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी कवडगाव, चिंचखेड बंड या जंगलामध्ये कर्तव्य बजावत असताना काही मेंढपाळ सदर जंगलामध्ये मेंढय़ा चारताना व झाडाचे नुकसान करताना निदर्शनास आले. कवडगाव, चिंचखेड बंड या जंगलामध्ये वनविभागाने सामाजिक वनीकरण अंतर्गत १६ हजार झाडे लावली आहेत. मात्र या झाडांचे नुकसान होत असल्याने वनविभाग कर्मचार्यांनी धडक कारवाई सदर मेंढय़ा वाहनामध्ये भरून खामगाव येथे नेत असताना वनविभाग परिक्षेत्राचे अधिकारी टि.एम. साळुंके व इतर कर्मचार्यांना रस्त्यात अडवून मेंढपाळांनी अचानक लाठीकाठीने वन अधिकार्यांवर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी मेंढपाळ मोहन हटकर, सतिष हटकर आदींविरुध्द कलम ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, ५0४, ५0६, ३४१ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.