अकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय उर्फ दादा मते पाटील यांचे रविवार, ६ सप्टेंबर रोजी निधन झाले.विजय उर्फ दादा नारायणराव पाटील (वय ६२ वर्षे) यांचे अकोल्यातील उमरीस्थित निवासस्थानी निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते आजारी होते. उपचारादरम्यान ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच १९९९ ते २००३ या कालावधीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते. २००४ मध्ये तत्कालीन बोरगावमंजू विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली होती. शहरातील उमरी येथील ब्रिटीशकालीन टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर या नामांकित संस्थेचे ते विद्ममान अध्यक्ष होते. प्रगतीशिल शेतकरी, सर्वसमान्यांत मिसळून काम करणारे आणि मनमिळाऊ स्वभावाचे नेते म्हणून दादा मते पाटील यांची ओळख होती.
अकोला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील यांचे निधन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 8:02 PM