दरोड्यातील चारही आरोपीस कोठडी
By admin | Published: April 27, 2017 01:26 AM2017-04-27T01:26:46+5:302017-04-27T01:26:46+5:30
अकोला : निमवाडी बसस्थानकाजवळ दरोड्याची तयारी करीत असलेल्या चार कुख्यात आरोपींना मंगळवारी अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयाने चारही आरोपींना २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अकोला : निमवाडी बसस्थानकाजवळ दरोड्याची तयारी करीत असलेल्या चार कुख्यात आरोपींना मंगळवारी अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने चारही आरोपींना २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील दोन आरोपी हे खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निमवाडी परिसरात छापा टाकून वाशिम बायपास परिसरातील भगीरथवाडी येथील रहिवासी ओमप्रकाश भरत भटकर (३२), गाडगे नगरातील रहिवासी बंटी भगवान लंकेश्वर (३१), वाशिम जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी साहेबराव आश्रुजी कालापाड (३२) आणि यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी नीलेश बिहारीप्रसाद ठाकूर (२९) यांना अटक केली. या चारही आरोपींकडून पोलिसांनी लोखंडी खंजर, दोरी, मिरची पावडरच्या पुड्या आणि वेगवेगळ्या चाव्यांचा गुच्छा व एक हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले होते.