दिवसभरात चौघांचा मृत्यू; २२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, १०९ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 06:57 PM2020-09-13T18:57:31+5:302020-09-13T18:58:25+5:30

रविवार, १३ सप्टेंबर रोजी अकोला शहरतील तीव व अकोट शहरातील एक अशा चार रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८१ वर गेला.

Four deaths during the day; 227 new positive patients, 109 discharged | दिवसभरात चौघांचा मृत्यू; २२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, १०९ जणांना डिस्चार्ज

दिवसभरात चौघांचा मृत्यू; २२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण, १०९ जणांना डिस्चार्ज

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, १३ सप्टेंबर रोजी अकोला शहरतील तीव व अकोट शहरातील एक अशा चार रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८१ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २२६ व खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात एक असे एकूण २२७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५६१४ झाली आहे. दरम्यान, १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्या १२०७ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५४७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२६ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी अहवाल आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील २८, चिखली ता. मुर्तिजापूर येथील १०, तेल्हारा व केडिया प्लॉट येथील सात, डाबकी रोड, देशमुख फैल व जीएमसी हॉस्टेल येथील सहा, उमरी येथील चार, महसूल कॉलनी, मलकापूर, अडगाव, गौरक्षण रोड, खडकी, जठारपेठ येथील प्रत्येकी तीन, सातव चौक, सदरपूर, गाडेगाव ता. तेल्हारा, कौलखेड, गिता नगर, न्यु तापडीया नगर, अकोट, बापूनगर येथील प्रत्येकी दोन, खोलेश्वर, शासकीय वसाहत, न्यु राधाकिसन प्लॉट, दहिहांडा, वाडेगाव, गंगानगर, वरुर जऊळका, आपातापा, संताजी नगर, जयहिंद चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, वडद, नेर ता. तेल्हारा, शिवाजी नगर, राऊतवाडी, शंकरनगर, वडाळी देशमुख, रणपिसे नगर, हिवरखेड, मुंकूद नगर, राऊतवाडी, तोष्णीवाल ले आऊट, झोडगा ता. बाशीटाकळी, जवाहर नगर, कैलास नगर, गणोरी, भगवतवाडी, ज्योती नगर, अग्रवाल एक्सटेंशन, निमवाडी, वृंदावन नगर, बोर्टा, कान्हेरी सरप, धाबा,सिरसो, सत्यविजय अर्पाटमेन्ट, मोखा, राजूरा घाटे, गोरखेडी ता. मुर्तिजापूर, गायत्री नगर, शास्त्री नगर, खदान, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, माळीपूरा, जूने शहर व पवन चौक येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील २८ , सहकार नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी पाच, डाबकी रोड, आदर्श कॉलनी व पोलिस रेल्वे क्वॉटर येथील प्रत्येकी तीन, खामखेडा, लहान उमरी व पैलपाडा ता. मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, जीएमसी क्वॉटर, लोहारी ता. अकोट, मंगरुळ कांबे ता. मुर्तिजापूर, व्हिएचबी कॉलनी, जळगाव जामोद, मलकापूर, आळशी प्लॉट, वाशिम बायपास, जूना बाळापूर नाका, गड्डम प्लॉट, रचना कॉलनी, शिवसेना वसाहत, रजपूतपुरा, माळीपूरा, खदान, चिखली, पिंगळा ता. मुर्तिजापूर व अकोट रोड येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

अकोल्यातील तीन, अकोटातील एक रुग्णाचा मृत्यू
रविवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोला शहरातील अंकुर अर्पाटमेंट, सिटी कोतवाली येथील ८१ वर्षीय पुरुष , देशमुख फैल येथील ३८ वर्षीय महिला, आळशी प्लॉट येथील महिला व अकोट येथील ६१ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

१०९ जणांना डिस्चार्ज

 दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५८ जण, कोविड केअर सेंटर अकोला येथून १९ जण, कोविड केअर सेंटर, मुर्तिजापूर येथून २१ जण, कोविड केअर सेंटर बाळापूर येथून ११ जणांना असे एकूण १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

१२०७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५६१४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४२२६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १२०७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

Web Title: Four deaths during the day; 227 new positive patients, 109 discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.