रेतीची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:57+5:302021-03-29T04:12:57+5:30

तालुक्यातील खदानीवरुन गौण खनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाने दिलेल्या परवानगी गैरवापर करीत (एमएच ४३यु ६००७) या क्रमांकाचे वाहनचालक अहमद ...

Four vehicles transporting sand illegally seized | रेतीची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त!

रेतीची अवैध वाहतूक करणारी चार वाहने जप्त!

Next

तालुक्यातील खदानीवरुन गौण खनिज वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाने दिलेल्या परवानगी गैरवापर करीत (एमएच ४३यु ६००७) या क्रमांकाचे वाहनचालक अहमद शाह याला एकाच पावतीवर दुसऱ्यांदा वाहतूक करताना पकडले. ट्रक जप्त करून अकोट शहर पोलीस ठाण्यात लावण्यात आला. अकोलखेड येथील नदीपात्रातुन रेतीची वाहतुक करताना (एम एच ०४ एजी०५१६) या क्रमांकाचा वाहनचालक अब्दुल साजीद अब्दुलशाहिद याला पकडण्यात आले. मार्डी येथून (एमएच ३० एबी ८३६५) व(एमएच ३० एबी ६२०९) या क्रमांकाचे दोन ट्रक्टर रेतीची अवैध वाहतूक करताना पकडले. सदर ट्रॅक्टर हे सुरेंद्र मोरे नामक व्यक्तीचे असल्याचे महसूल पथकाने सांगितले. सदर वाहने जप्त करून पोलीस ठाण्यात लावण्यात आली आहेत. ही कारवाई नायब तहसीलदार हरिश गुरव, मंडळ अधिकारी नीळकंठ, तलाठी अनिल रावणकार, राजेश खामकर, किशोर सोलकर, शैलेश मेतकर यांनी केली.

फोटो:

Web Title: Four vehicles transporting sand illegally seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.