बसस्थानकावरुन चार महिला चोर पोलिसांच्या जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:35 PM2019-12-07T18:35:47+5:302019-12-07T18:35:54+5:30
चारही महिलांना पकडून सिव्हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन क रण्यात आले.
अकोल : सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाश्यांचे साहित्य चोरणाऱ्या चार महिलांना नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या चारही महिलांना पकडून सिव्हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन क रण्यात आले. मात्र. पोलिसांनी या महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील प्रवांशाच्या साहित्यांवर नजर ठेवून असलेल्या चार महिलांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे काही जागरुक नागरिकांच्या लक्षात आले. याचवेळी या महिला एका महिलेच्या बँगेतून पैसे काढून पळ काढण्याचा प्रयत्न क रण्याच्या बेतात असतांनाच नागरिकांनी चोर-चोर म्हणून आरडाओरड सुरू केली. त्यानंतर चोरट्या महिलांना नागरिकांनी पकडून सिव्हिल लाईन पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र. पोलिसांनी या महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, गत काही दिवसांपासून अकोला शहरासह मध्यवर्ती बसस्थानकावर महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी मद्देमाल लंपास केल्याच्या घटना सातत्याने घडत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीने वातावरण पसरले आहे. याकडे पोलिस विभागाने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. पोलिसांनी महिलांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरात चोरट्या महिलांची टोळी सक्रिय असल्याचे दोन ते तीन ठिकाणावर झालेल्या चोºयानंतर समोर आले होते.