लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शालेय विद्यार्थ्यांचे दुभंगलेले ओठ, चेहºयावरील विद्रूप व्रण, डाग, नाक, कानावरील बाह्यव्यंग, पापण्यामधील विकृती अशा प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, शिवाजी नगर, चांदमल मुनोत ट्रस्टच्यावतीने ११ ते १४ जानेवारी २0१८ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर पुण्यातील शिवाजी नगरात आयोजित करण्यात आले आहे.अमेरिकेतील विश्वविख्यात प्लास्टिक सर्जन स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे शिबिर होणार आहे. स्व. डॉ. दीक्षित यांनी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या माध्यमातून ४२ वर्षात २ लाख ६६ हजार मोफत शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. त्यांच्या मानवसेवेचा हा यज्ञ त्यांचे शिष्य अमेरिकेतील प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टेन यांनी तीन वर्षांपासून सुरू ठेवला आहे. यंदा होणाºया शिबिरामध्ये ६00 ते ७00 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शाळांमध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये दुभंगलेले ओठ, चेहºयावर विद्रूप व्रण, नाक, कानावरील बाह्यव्यंग यासह चेहºयावर अनेक व्यंग दिसून येतात; परंतु पैशांअभावी हे विद्यार्थी उपचार व शस्त्रक्रिया करू शकत नाहीत. राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी शिक्षण उपसंचालक (पुणे) यांना पत्र पाठविले आहे. शिक्षण उपसंचालकांनीसुद्धा शिक्षणाधिकाºयांना पत्र पाठवून या शिबिराची माहिती विद्यार्थी व पालकांनी देण्याची सूचना केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:43 AM
भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, शिवाजी नगर, चांदमल मुनोत ट्रस्टच्यावतीने ११ ते १४ जानेवारी २0१८ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर पुण्यातील शिवाजी नगरात आयोजित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेचे शिक्षण विभागाला पत्रमहागड्या शस्त्रक्रिया मोफत करणार