Ganesh Mahotsav : बाप्पा यावे...विघ्न घालवावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 10:07 AM2020-08-22T10:07:19+5:302020-08-22T10:07:26+5:30
सार्वजनिक गणेश मंडळांसह अनेक नागरिकांनी शुक्रवारीच गणरायाची मूर्ती घरी नेण्यावर भर दिल्याचे दिसून आले.
अकोला : कोरोना संकटामुळे यावर्षी गणेशोत्सवातील भव्यता कुठेही दिसत नसली तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून गणरायाच्या स्वागतासाठी अकोला जिल्हा सज्ज झाला आहे. सार्वजनिक गणेश मंडळांसह अनेक नागरिकांनी शुक्रवारीच गणरायाची मूर्ती घरी नेण्यावर भर दिल्याचे दिसून आले.
शहरात ४० हजार मूर्ती
श्री गणेशाच्या तब्बल ४० हजारावर मूर्ती शुक्रवारी विकल्या गेल्या असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रमाणात मूर्ती तयार केल्या होत्या. त्यातही शाळू मातीच्या मूर्तीबाबत सर्वाधिक ग्राहकांनी विचारणा केली. यावर्षी सार्वजनिक गणेश मंडळांचीही संख्या घटली असल्याने मोठ्या मूर्ती नाहीत. उद्या संध्याकाळपर्यंत घरगुती मूर्ती विक्रीची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हीच संख्या १ लाखावर होती.
कोरोना संक्रमण रोखणे महत्त्वाचे
श्री गणेश स्थापना ते विसर्जन या कालावधीत होणारे गर्दीचे प्रसंग टाळून आपण आपले व आपल्या परिवारासह समाजाचेही रक्षण करावे. कोरोनाचे संक्रमण रोखणे हीच खरी गणेश भक्ती ठरेल, त्यामुळे प्रत्येकाने प्रतिबंधक नियमांचे पालन करावे.
-जितेंद्र पापळकर,
जिल्हाधिकारी