अकोला: घरोघरी जाऊन कचरा जमा करणाºया घंटागाडी चालकांना वठणीवर आणण्यासाठी महापालिका आयुक्त संजय कापडणीस प्रयत्नात असताना त्यांच्या प्रयत्नाला खोडा घालण्याचे काम आरोग्य निरीक्षकांकडून केल्या जात आहे. घंटागाडी चालक व आरोग्य निरीक्षकांचे साटेलोटे असल्याने नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर कचºयाची साठवणूक न करता चक्क राष्ट्रीय महामार्गालगच्या खुल्या जागांवर कचरा टाकून घंटागाडी चालक पळ काढत आहेत. याप्रक रणी आरोग्य निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.प्रभागातील दैनंदिन स्वच्छतेच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने आरोग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. आस्थापनेवरील सफाई कर्मचारी असो वा पडीत प्रभागातील खासगी सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद करणे आरोग्य निरीक्षकांना बंधनकारक आहे. शहरातील सार्वजनिक जागा, मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्ते, सर्व्हिस लाइन, नाल्यांची दररोज साफसफाई करण्यासाठी प्रशासनाने सुमारे अकराशेपेक्षा अधिक सफाई कर्मचाºयांची नियुक्ती केली. सर्व्हिस लाइनमधून निघणारा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाने भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर कार्यान्वित केले आहेत. तसेच घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२० पेक्षा अधिक घंटा गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्थातच या सर्वांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांची असली तरी काही कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे घंटागाडी चालकांच्या मनमानीला ऊत आल्याचे चित्र आहे. प्रभागातून जमा होणारा कचरा नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर टाकणे अपेक्षित आहे. तसे न करता बहुतांश घंटागाडी चालक सोयीनुसार शहरालगतच्या खुल्या जागा, राष्ट्रीय महामार्गालगच्या जागांवर कचरा टाक त आहेत. महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शहराच्या चारही बाजूने फेरफटका मारल्यास हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येईल, हे नक्की.कचरा पेटविण्याच्या प्रकारांत वाढमनपा आयुक्तांनी घंटागाडी चालक व आरोग्य निरीक्षकांवर कारवाईचा दांडुका उगारताच काही बहाद्दर शहरालगतच्या खुल्या जागांवर साठवणूक केलेल्या कचºयाला आग लावत असल्याचे समोर आले आहे. रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील गुरांच्या बाजारासमोर खुल्या जागेवरील कचºयाला आग लावण्यात आल्याने सर्वत्र धूर पसरला होता. असे प्रकार नगरसेवक तसेच आरोग्य निरीक्षकांच्या निदर्शनास येत नाहीत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
घंटा गाडीच्या इंधनात गोलमाल!घंटा गाडीमध्ये दररोज नेमके किती लीटर इंधन आवश्यक आहे, याचा मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी आढावा घेतला असता मोटार वाहन विभागासह आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाचा पर्दाफाश झाला होता. अनेक घंटा गाडी चालक वाहनातील कचरा नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर साठवणूक करीत नसल्याचे समोर आले. त्या वाहनाच्या डम्पिंग ग्राउंडवरील एकूण फेऱ्या तपासल्या असता, इंधनात घोळ होत असल्याचे उघडकीस आले होते.