वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायमस्वरुपी निकाली काढा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:41+5:302021-06-19T04:13:41+5:30

शहरामध्ये वीज वितरण कंपनीचे २ भाग आहे भाग क्रमांक १ हा स्टेशन विभागामध्ये आहे व भाग क्रमांक २ हा ...

Get rid of power outages permanently! | वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायमस्वरुपी निकाली काढा !

वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या कायमस्वरुपी निकाली काढा !

Next

शहरामध्ये वीज वितरण कंपनीचे २ भाग आहे भाग क्रमांक १ हा स्टेशन विभागामध्ये आहे व भाग क्रमांक २ हा जुनी वस्ती शहरामध्ये आहे. या भागात गेल्या १० वर्षांपासून सतत वीजपुरवठा खंडित होतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत नाही. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन भाग क्रमांक २ जुनी वस्तीमधील वीज पुरवठा संदर्भात होणारा त्रास कायमस्वरुपी मार्गी लावावा, भाग क्रमांक १ मधील वीजपुरवठा वारा, पाऊस आल्यानंतरही सुरळीत सुरू राहतो. मग भाग क्रमांक २ जुनी वस्ती येथील वीजपुरवठा का खंडित होतो, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. हा वीजपुरवठा दिवसाला १० ते १२ वेळा खंडित होतो. तसेच एखाद्या वेळेला २० ते २५ वेळा वीजपुरवठा खंडित केल्या जातो. याला नागरिक त्रस्त झाले असल्याचे निवेदनात सांगितले आहे. निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शुभम मोहोड, पुष्पक डोगरे, अतुल गावंडे, शुभम कदम, आशुतोष भेले, प्रतीक नागरीकर, विलास वानखडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Get rid of power outages permanently!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.