अंदुरा येथील विद्या मंदिरात नियमबाह्य संचालक मंडळाची निवड करण्याचा घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:24 AM2021-09-17T04:24:21+5:302021-09-17T04:24:21+5:30

ग्रामपंचायतच्या मासिक सभेत अनेक ठराव घेतले आहेत. याबाबत विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद जयदेव पाटील यांनी लेखी तक्रार शिक्षणाधिकारी ...

Ghat to select board of directors in Vidya Mandir in Andura! | अंदुरा येथील विद्या मंदिरात नियमबाह्य संचालक मंडळाची निवड करण्याचा घाट!

अंदुरा येथील विद्या मंदिरात नियमबाह्य संचालक मंडळाची निवड करण्याचा घाट!

Next

ग्रामपंचायतच्या मासिक सभेत अनेक ठराव घेतले आहेत. याबाबत विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद जयदेव पाटील यांनी लेखी तक्रार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे केली आहे. याबाबतीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन विद्या मंदिर शाळेत कार्यरत असणारी समिती ही नियमानुसार असून या समितीला पाच वर्षे हटविण्याचा अधिकार ग्रामपंचायतला नाही व ग्रामपंचायतने घेतलेले ठराव नियमबाह्य आहेत.

सरपंच, सदस्यांविरूद्ध कारवाई करण्याचे सीईओंचे संकेत!

ठराव घेणारे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे ३९(१) चा भंग केला असून, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे पत्र गटशिक्षणाधिकारी बाळापूर यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच अंदुरा ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी यांनी अधिनियम १९५९ कलम ३९( १) चा भंग केला काय? याची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत सुचविले आहे.

ग्रामपंचायतच्या सदस्यांची संस्थाचालकपदी निवड बेकायदेशीर

विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी शाळेच्या बेरार ॲक्ट १९३९ कलम ४ नुसार ११ सदस्यांची कार्यकारिणी गठित करणेबाबत ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे ठराव घेऊन संजय वानखडे, अक्षय वानखडे, वंदना गवारगुरु, अर्चना भगत, सीताबाई उगले या ग्रामपंचायत सदस्यांची सभासद म्हणून बेकायदेशीरपणे निवड केली. तसेच गावातील शाम वराळे व महादेव ढंगारे यांची निवड देखील बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी केला असून महादेव तुळशीराम ढंगारे यांनी विद्या मंदिर शाळेची जमीन विक्री करुन गैरव्यवहार केला असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. गटशिक्षणाधिकारी यांनी अधिनियम १९५९ कलम ३९ ( १) ग्रामपंचायतने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला काय याबाबत १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता पुढील सुनावणीकरिता हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत

Web Title: Ghat to select board of directors in Vidya Mandir in Andura!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.