SSC Result 2019: दहावीतही मुलींचीच बाजी; अकोला जिल्ह्याचा निकाल ७०.८२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 01:54 PM2019-06-08T13:54:47+5:302019-06-08T17:43:35+5:30

अकोला जिल्ह्याचा निकाल ७०.८२ टक्के लागला असून, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे.

Girls top in SSC exam; Akola district results in 70.82 percent | SSC Result 2019: दहावीतही मुलींचीच बाजी; अकोला जिल्ह्याचा निकाल ७०.८२ टक्के

SSC Result 2019: दहावीतही मुलींचीच बाजी; अकोला जिल्ह्याचा निकाल ७०.८२ टक्के

Next
ठळक मुद्दे मुलींचा निकाल ७८.६४ टक्के, तर मुलांचा निकाल ६३.७२ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण २७ हजार ३१३ नोंदणीकृत परीक्षार्थी विद्यार्थी होते. एकूण १९११४ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.

अकोला : मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्य उच्च माध्यमिक इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवार, ८ जून रोजी जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. बारावीच्या निकालातही मुलीच अव्वल ठरल्या होत्या. दहावीच्या निकालाने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले असून अनेक ठिकाणी यशाचे ‘सेलिब्रेशन’ दिसून आले.
अकोला जिल्ह्याचा निकाल ७०.८२ टक्के लागला असून, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ७८.६४ टक्के, तर मुलांचा निकाल ६३.७२ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण २७ हजार ३१३ नोंदणीकृत परीक्षार्थीविद्यार्थी होते. त्यापैकी २६ हजार ९८० विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४२६१ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत,७२०१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६३२४ द्वितीय श्रेणीत, तर १३२८ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण १९११४ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.
अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याचा सर्वाधिक ७४.९३ टक्के निकाल लागला आहे. उर्वरित तालुक्यांत बार्शीटाकळी ७२.१२ टक्के, मूर्तिजापूर- ७१.३७टक्के, बाळापूर- ६८.८५ टक्के, अकोला ७३.२५ टक्के, तेल्हारा ६८.१३ टक्के, तर अकोट तालुका ६४.९१ टक्के निकाल आहे.

Web Title: Girls top in SSC exam; Akola district results in 70.82 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.