सीबीएसई दहावी परीक्षेत मुलीच आघाडीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:57 PM2019-05-07T12:57:44+5:302019-05-07T12:57:51+5:30

अकोला: सीबीएसई दहावीचा परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला असून, निकालामध्ये पुन्हा मुलीच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

Girls topper in CBSE Class X exam! | सीबीएसई दहावी परीक्षेत मुलीच आघाडीवर!

सीबीएसई दहावी परीक्षेत मुलीच आघाडीवर!

googlenewsNext

अकोला: सीबीएसई दहावीचा परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला असून, निकालामध्ये पुन्हा मुलीच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सीबीएसई माध्यमिक शाळांनी घवघवीत यश संपादन केले. शहरातील नोएल स्कूल, प्रभात किड्स स्कूल, ज्युबिली सीबीएसई स्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर्स हिंगणा रोड, एमराल्ड हाईट्स सीबीएसई स्कूल, जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रभातच्या प्रथमेश जोशी ९८.२ टक्के याने शाळेतून प्रथम स्थान तर तन्वी भुसारी ९७.६० टक्के हिने द्वितीय, अदिती सरदार ९७.४० हिने तृतीय प्राची धोटे ९७.२० हिने चतुर्थ आणि नंदिनी राठी ९७ हिने पाचवे स्थान पटकावले. नोएल स्कूलचा तुषार कराळे ९७.६0 याने शाळेतून प्रथम, आयुष जिवतरामानी ९७.४0 याने द्वितीय, सुमित धुळे ९६.८0 याने तृतीय तर सेजल बुटे ९५.६0 हिने चतुर्थ आणि आदेश सिरसाट ९५.४० याने पाचवा क्रमांक पटकावला. एमराल्ड हाईट्स स्कूलचा निकाल १00 टक्के लागला असून, शाळेतून ओजस चितलांगे याने ९४.२ प्रथम स्थान पटकावले. ओमकार जोशी ९३.६ याने द्वितीय, ओम पाटील ९३.४ याने तृतीय, श्रृती शेंदुरकर ९२.८ हिने चतुर्थ तर मुशफायदा सिमीन ९२.६ हिने पाचवे स्थान प्राप्त केले. स्कूल आॅफ स्कॉलर्स हिंगणा रोड येथील श्रोण वाघ याने ९७.४ टक्के मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. रोहन पाटील याने ९७ टक्के द्वितीय, प्राची राठी, श्रद्धा शिंदे यांनी ९६.८ टक्के मिळवून तृतीय स्थान पटकावले. संपदा पंचभाई हिने ९६.६ चतुर्थ तर प्रसन्न धवले ९६.४ याने पाचवे स्थान प्राप्त केले. ज्युबिली इंग्लिश सीबीएसई हायस्कूल (कुंभारी)चा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतून उत्कर्ष कंकाळ याने ९१.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश् खवले याने ८६.६ द्वितीय तर प्रतीक जोशी याने ८२.४ टक्के गुण मिळवित तृतीय स्थान पटकावले. 

२१ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले विविध विषयांमध्ये १०० टक्के गुण
मराठीसह गणित, इतिहास, संस्कृत, माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्येदेखील २१ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. गणितात नंदिनी राठी, पार्थ नावकार, प्रथमेश जोशी व तन्वी भुसारी यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले. संस्कृत विषयात अभय अवचार, आदिती सरदार, खुशी झंवर, पार्थ नावकार, प्रथमेश जोशी, रोमील सेठ व वरद वानखडे तर आयटी या विषयात भैरवी देशमुख, फिरदोस खान, गायत्री म्हैसणे आणि प्रचेता मुकुंद यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे. अनिकेश इंगळे, श्रोण वाघ, श्रद्धा शिंदे, मधुरा देशपांडे, अदिती देशमुख यांनी मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले. प्रसन्न ढवळे, विराज जगताप यांनी गणितात तर सात्विक शाह, श्रोण वाघ, भक्ती शेंडे, आर्या पाटोळकर, प्राची राठी यांनी सामाजिक विज्ञानमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले.

मराठीतही १00 पैकी १00 गुण
भाषा विषयातही म्हैसणे, हर्षल भटकर, मैथिली वानखडे व निरंजन देशमुख या विद्यार्थ्यांनी मराठी मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.

 

Web Title: Girls topper in CBSE Class X exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.