खासगी डॉक्टरांचा जीएमसीत रुग्णसेवेला नकार
जीएमसीत तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी पडत असल्याने खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचा विचार सुरू असला तरी खासगी रुग्णालयातील कमाई सोडून खासगी डॉक्टर शासकीय सेवा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे वर्ग चार कर्मचाऱ्यांसह परिचारिकांचा प्रश्न सुटला तरी डॉक्टरांची कमी पूर्ण कशी करणार हा प्रश्न कायम आहे.
रुग्ण आणि नातेवाइकांचा संपर्क व्हावा
कोविड रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाइकांचा संपर्क व्हावा, या अनुषंगाने उपाययोजना करण्याचेही त्यांनी यावेळी सुचविले. त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना रुग्ण व नातेवाईक यांच्यातील दुवा करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
ऑक्सिजन प्लान्टच्या हालचाली सुरू
जीएमसीमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लान्ट उभारण्यासाठी अधिष्ठाता यांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री कडू यांनी दिल्या. त्याला त्वरित मान्यता देऊन ३० खाटांना ऑक्सिजन पुरेल एवढी क्षमता असलेला प्लान्ट सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
जुलै अधिवेशनात मांडणार मुद्दे
आकृतिबंदचा प्रश्न सोडविणे
१९२७ मधील बांधलेल्या जुन्या इमारतीच्या जागी नवी अद्यावत इमारत बांधणे
सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी आवश्यक पदभरती
फ्रंट लाइन वर्करला इन्क्रीमेंट द्या