सरकारी रुग्णालयाकडेच अग्निशमनची एनओसी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:15 AM2021-01-14T04:15:47+5:302021-01-14T04:15:47+5:30

सुरत येथील खासगी शिकवणी वर्गाला आग लागल्याची घटना घडल्यानंतर झाेपेतून जागे झालेल्या काेचिंग क्लास संचालकांनी इमारतींमध्ये अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा ...

The government hospital itself does not have a fire fighting NOC | सरकारी रुग्णालयाकडेच अग्निशमनची एनओसी नाही

सरकारी रुग्णालयाकडेच अग्निशमनची एनओसी नाही

googlenewsNext

सुरत येथील खासगी शिकवणी वर्गाला आग लागल्याची घटना घडल्यानंतर झाेपेतून जागे झालेल्या काेचिंग क्लास संचालकांनी इमारतींमध्ये अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा लावली हाेती. आगीच्या घटनांमध्ये हकनाक निष्पाप बळी जात असतानाही सरकारी यंत्रणा बाेध घेत नसल्याचे समाेर आले आहे. भंडारा येथील रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेमुळे राज्यभरातील वैद्यकीय आराेग्य यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. मनपाच्या अखत्यारित असलेल्या अग्निशमन विभागाकडून शासकीय व खासगी रुग्णालयांमधील अग्निराेधक उपकरणांबद्दल संबंधितांना सूचना दिली जाते. शासकीय कार्यालये, रुग्णालये, हाॅटेल, सिनेमागृह, रेस्टाॅरंट,बार यासह वाणिज्य संकुलांमध्ये अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा उभारल्यानंतर त्याची तपासणी करून अग्निशमन विभागाकडून ‘एनओसी’देण्यात येते. शहरात विविध ठिकाणी लहान माेठी १६० खासगी रुग्णालये असून संबंधितांना अग्निशमन विभागाकडून ‘एनओसी’देण्यात आली आहे. तर खुद्द सरकारी रुग्णालयांमध्येच अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा सक्षम नसल्यामुळे त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

सरकारी रुग्णालयांची अनास्था

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय अधिष्ठाता महाविद्यालय व जिल्हा स्त्री रुग्णालयात अद्ययावत अग्निराेधक सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे यानिमित्ताने उजेडात आले आहे. संबंधित यंत्रणेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बाेट दाखवले जाते. या दाेन्ही यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव सर्वसामान्य रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारी रुग्णालयांद्वारे उभारण्यात आलेल्या नवीन इमारतींमध्ये अग्निराेधक सुरक्षा यंत्रणेचा अभाव आहे. सुरक्षा यंत्रणेची पाहणी केल्यानंतरच त्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले जाईल. तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

- मनीष कथले, अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग मनपा

१६०

नाेंदणी असणारी रुग्णालये

१६०

फायर ब्रिगेड एनओसी असलेली रुग्णालये

एनओसी नसलेली रुग्णालये

Web Title: The government hospital itself does not have a fire fighting NOC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.