माझोड येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:18 AM2021-03-15T04:18:09+5:302021-03-15T04:18:09+5:30
-------------------------------- इंधन दरवाढीमुळे यांत्रिक मशागत महागली! वाडेगाव : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल ...
--------------------------------
इंधन दरवाढीमुळे यांत्रिक मशागत महागली!
वाडेगाव : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे. त्यामुळे शेतकरीही मेटाकुटीस येत असल्याचे दिसून येते.
------------------------------
वीट उत्पादक अडचणीत!
चोहोट्टा : वीट उत्पादनासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या राखेचे दर गत काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. त्यामुळे वीट उत्पादकांवर संकट कोसळले असल्याने शासनाने राखेचे भाव नियंत्रित करावे, अशी मागणी वीट व्यावसायिकांकडून होत आहे.
-------------------------
बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण
हाता : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे या संधीचा लाभ घेत खासगी वाहनचालकांनी भाडेवाढ केली आहे.
------------------------------
रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या!
वाडेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, तसेच चौकालगत भाजी, फळ, तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे ग्रा.पं. प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज आहे.
-----------------------------------------
कोरोनामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा फटका!
मूर्तिजापूर : गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे.
-----------------------------------
पाच दिवसांचा आठवडा; नागरिक त्रस्त
बार्शीटाकळी : पाच दिवसांच्या आठवड्याने शासकीय कामे प्रलंबित राहत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. यापासून वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याने गावांचा अपेक्षित विकास होण्यास अडचणी आहेत.
=--------------------------------------
बंदी असतानाही गुटख्याची विक्री
अकोट : गुटख्याच्या विक्रीला बंदी असतानाही तालुक्यातील अनेक भागांत गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
--------------------------------
आठवडी बाजार बंद असल्याने शेतकरी संकटात
बोरगाव मंजू : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.