५ डिसेंबर २०२० रोजी तालुक्यातील राजनखेड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२व्या तालुकास्तरीय पुण्यतिथी पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते. राजनखेड येथील ज्येष्ठ प्रचारक बाबाराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून कान्हेरी सरप येथील सेंद्रिय शेतीतज्ज्ञ श्रीकृष्ण ठोंबरे होते. यावेळी जिल्हा प्रचारप्रमुख डॉ. अशोक रत्नपारखी, ज्येष्ठ साहित्यिक तुळशिराम बोबडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी म्हणून तालुका सेवाधिकारी संतोष सोनोने, गुरुकुंज आश्रमचे प्रचार विभाग सदस्य रामेश्वर बरगट, निखाडे, ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास रत्नपारखी, सरचिटणीस रविसिंह डाबेराव, केंद्रप्रमुख सुरेशराव सावरकर, धनंजय ढोरे, साहेबराव ठाकरे, सुनील भारसाकडे, दीपक लुंगे, अरविंद रत्नपारखी, नंदकिशोर शेंडे, श्रीकृष्ण महाराज पांडे, वासुदेव कराळे, दिनकर मडावी, श्रीकृष्ण काकड, लक्ष्मण दुधमल, वसंता काकड, बबनराव कावरे यांची उपस्थिती होती. सायंकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करून सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. त्यानंतर ग्रामगीता ग्रंथ मिरवणूक काढून घरोघरी ग्रामगीतेचे पूजन झाले. रात्री खंजेरी भजन संमेलनाला सुरुवात झाली. तालुकाभरातून आलेल्या भजन मंडळांनी राष्ट्रसंतांची भजने सादर केली. ६ डिसेंबरला सकाळी सामूहिक ध्यान पाठ करून राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
फोटो :