४० हजाराचा गुटखा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:11+5:302021-06-30T04:13:11+5:30

गंगानगर भागातील गोवर्धन प्लॉट परिसरात जावेद किराणा येथे प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती दहशतवादविरोधी ...

Gutkha worth Rs 40,000 seized | ४० हजाराचा गुटखा पकडला

४० हजाराचा गुटखा पकडला

Next

गंगानगर भागातील गोवर्धन प्लॉट परिसरात जावेद किराणा येथे प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. हा धागा पकडून जावेद खान यासीन खान याला ताब्यात घेऊन दुकानाची झाडाझडती घेतली असता, प्रतिबंधित गुटख्यासह पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. या मालाची किंमत १० हजार १२५ रुपये एवढी आहे. याच भागातील एका भाड्याच्या घरात राहत असलेल्या अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार याच्या घरी छापा मारला असता ३० हजार १०० रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. दोघांविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

४०५ ग्रॅम गांजा जप्त

दहशतवादविरोधी पथकाने जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतला माता मंदिर परिसरात राहणाऱ्या गणपत राधाकिसन कनोजिया याच्या घरून ४०५ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत चार हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी गणपत कनोजियाविरुद्ध एनडीपीसी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gutkha worth Rs 40,000 seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.