शेतकऱ्यास लुटणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 05:06 PM2021-03-31T17:06:12+5:302021-03-31T17:06:39+5:30

Handcuffs to those who rob farmers : चाकूचा धाक दाखवत काळे यांच्या खिश्यातून एक लाख रुपये बळजबरीने हिसकून पळ काढला हाेता.

Handcuffs to those who rob farmers | शेतकऱ्यास लुटणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या

शेतकऱ्यास लुटणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या

Next

अकोला : शेतकऱ्यास लुटणाऱ्या अाराेपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी यश अाले. लुटीची घटना शनिवारी रात्री पातूर राेडवर घडली हाेती.

मळसूर येथील शेतकरी विलास यशवंत काळे यांनी एक लाख रुपये लुटल्याची तक्रार २७ मार्च राेजी पातूर पाेलीस ठाण्यात नाेंदविली हाेती. ते दुचाकीने अकोला कृषी उत्पन्न बाजार येथून हरबरा विक्रीचे नगदी पैसे घेवून गावी परत जात होते. एका अनोळखी इसमाने त्यांना पेट्रोल संपल्याचा बहाना करून पेट्रोलपंपापर्यंत गाडीवर येऊ देण्याची विनंती केली. त्याला मोटारसायकलवर बसविले. मात्र अारेपीने नांदखेड फाटा येथे मोटरसायकल थांबवून चाकूचा धाक दाखवत काळे यांच्या खिश्यातून एक लाख रुपये बळजबरीने हिसकून पळ काढला हाेता. आरोपीसोबत त्याचा साथिदारही होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने िफरवित अाराेपींना अटक केली. ही कामगिरी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेिलस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेष सपकाळ, प्रमाेद डाेईफाेडे, अश्विन सिरसाट, फिराेज खान, शक्ति कांबळे, मनाेज नागमते, संदीप ताले यांनी केली.

 

वाशिम येथून केली अटक

लुटमारीच्या तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथकाकडे साेपविली. त्यांना गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेष सपकाळ यांनी तपासाची िदशा निश्चित करुन दिली. मंगळवारी पथकाने वाशिम येथील राम मंदिर परिसरातून विजय भोलाप्रसाद गुप्ता (२६ ) व लखन अरूण गवळी (१९) या दोघांना ताब्यात घेतले. दाेघांची कसून चाैकशी करण्यात अाली.अखेर अाराेपींकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुन्हयात वापरण्यात अालेली एक काळया निळया रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (क्र.एमएच ३७ झेड ३८०३) व एक मोबाईल फाेनही जप्त केला. पुढील तपासासाठी आरोपी पातूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Handcuffs to those who rob farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.