‘ती’ घडली; तुमच्याही घरी ‘तिला’ घडवा !

By admin | Published: September 12, 2016 04:45 PM2016-09-12T16:45:00+5:302016-09-12T16:45:00+5:30

मालेगाव येथील नगर पंचायत समोरील शिवशक्ती गणेश मंडळाने प्रबोधनात्मक जनजागृतीची परंपरा कायम ठेवत या वर्षी ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ यावर लक्ष केंद्रीत केलं

'That' happened; Make your 'home' at your home! | ‘ती’ घडली; तुमच्याही घरी ‘तिला’ घडवा !

‘ती’ घडली; तुमच्याही घरी ‘तिला’ घडवा !

Next
अमोल कल्याणकर,ऑनलाइन लोकमत
मालेगाव (वाशिम ),दि.12- मालेगाव येथील नगर पंचायत समोरील शिवशक्ती गणेश मंडळाने प्रबोधनात्मक जनजागृतीची परंपरा कायम ठेवत या वर्षी ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.  आॅलिम्पिकमध्ये रजत पदक मिळवणारी पी. व्ही. सिंधू, वयाच्या १६ व्या वर्षी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सैराटफेम रिंकु राजगुरु व आॅलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारी साक्षी मलिक यांचे ‘कटआऊट फ्लेक्स’ दर्शनी भागात लावून ‘ती’ घडली; तुमच्याही घरी ‘तिला’ घडवा !’  असा संदेश देण्यात आला आहे.
 
या मंडळाने कर्तुत्ववान महिलांची महती दर्शविणारी सीडी तयार केली असून, दररोज सायंकाळी ही सीडी दाखविली जात आहे. शासनानेसुद्धा या वर्षी लोकमान्य सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा सुरु केली असून, त्यामधे लोकमान्य टीळक यांच्या सुराज्य कल्पनेशी सुसंगत अशा कल्पना, कला आणि देखावामधील स्वदेशी, साक्षरता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ, जलसंवर्धन अशा विविध बाबींशी निगडित कल्पना सादर करणा-याया मंडळाना आकर्षक बक्षिस सुद्धा देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शिवशक्ति गणेश मंडळ यांच्या सर्व पदाधिकाºयांनी ‘बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ’ या विषयाला प्राधान्य देऊन कर्तुत्ववान महिलांची महती सांगणारी आणि स्त्री जन्माचे स्वागत करण्याचे आवाहन करणारी एक सीडी तयार करुण त्याद्वारे समाज प्रबोधन सुरु केले आहे. तसेच ‘कटआऊट फ्लेक्स’ दर्शनी भागात लावून, प्रत्येक क्षेत्रात मुलींची कामगिरी  चमकदार असल्याचा संदेश दिला जात आहे. 
 
लोकमान्य टिळकांपासून माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पी.टी.उषा, सिंधुताई सपकाळ, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, बहिनाबाई चौधरी, कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील, झाशीची राणी, ऐश्वर्या रॉय, लता मंगेशकर यासह इतरांसमोर आदर्श निर्माण करणा-या महिलांची माहिती सीडीद्वारे लोकांसमोर ठेवली जात आहे. वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलींना गर्भातच मारल्या जाते, हे अयोग्य असून, मुलीलाही वंशाचा दिवा समजा, असा संदेश दिला जात आहे.

 

Web Title: 'That' happened; Make your 'home' at your home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.