अकोला: शहरातील अतिक्रमणाच्या समस्येचा अकोलेकरांना वैताग आला आहे. रस्त्यालगत जागा दिसेल त्या ठिकाणी उघड्यावर अतिक्रमक बाजार मांडत असल्यामुळे वाहतुकीच्या समस्येत भर पडली आहे. अतिक्रमणाच्या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांना विशिष्ट भागात जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने हॉकर्स झोन निश्चित केले. बाजार विभाग, नगर रचना व बांधकाम विभागाच्या समन्वयातून २१ ठिक ाणी हॉकर्स झोन तसेच ३१ ठिकाणी ‘नो हॉकर्स झोन’ची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर पुढे कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अतिक्रमणाची समस्या कायम असल्याचे चित्र आहे.शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमकांनी गिळंकृत केले आहेत. रेडीमेड ड्रेस विक्रेता, फळ विके्रता तसेच विविध साहित्याची विक्री करणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांनी चक्क रस्त्यांवरच दुकाने थाटल्याचे चित्र आहे. शहरातील मोठी प्रतिष्ठाने, दुकानांसमोर लघू व्यावसायिक बाजार मांडत असल्यामुळे अनेकदा दोन्ही व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होतात. अतिक्रमणाचे लोन गल्लीबोळात पसरले असून, अनेकांनी चक्क सर्व्हिस लाइनमध्ये भाजी विक्रीची दुकाने उभारली आहेत. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाच्या समस्येमुळे नागरिकांना पायी चालणे मुश्कील झाले आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमकांना वारंवार हुसकावून लावल्या जात असल्याने त्रस्त झालेल्या अतिक्रमकांकडून फेरीवाला धोरण लागू करण्याची मागणी जोर धरू लागली. या सर्व बाबी ध्यानात घेऊन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरात विशिष्ट भागात ‘हॉकर्स व नो हॉकर्स झोन’च्या जागा निश्चित करण्याचे निर्देश बाजार विभाग, नगररचना विभाग, बांधकाम विभागाला दिले होते. संबंधित विभागाने समन्वय साधत फेरीवाले, लघू व्यावसायिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून २१ ठिकाणी ‘हॉकर्स झोन’ व ३१ जागा ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित केल्या. तशी यादी तयार करण्यात आली. त्यानंतर पुढे मनपाने कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे अतिक्रमकांची समस्या कायमच आहे.कर्मचाऱ्यांची हवी उचलबांगडीमहापालिका प्रशासनाच्या धोरणाला हरताळ फासून अतिक्रमकांची अप्रत्यक्षरीत्या पाठराखण करणाºया अतिक्रमण विभागातील काही ठरावीक कर्मचाºयांची उचलबांगडी करण्याची गरज आहे. काही कर्मचारी भाजी व फळ विके्रत्यांकडून दररोज न चुकता फुकटात भाजी व फळे घेऊन जातात. या प्रकाराचा संबंधित व्यावसायिकांना वैताग आल्याची माहिती आहे.
अतिक्रमकांसोबत अर्थपूर्ण संबंधअतिक्रमण विभागातील अनेक कर्मचाऱ्यांचे रस्त्यांवर दुकाने थाटणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांसोबत अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे प्रशासनाने कितीही काटेकोर नियोजन करून दिले तरी संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचे दिसून येते. हॉकर्स झोन निश्चित केल्यानंतरही लघू व्यावसायिक त्या ठिकाणी व्यवसाय का थाटत नाही, असा प्रश्न उपस्थित होऊन अतिक्रमण विभागाची भूमिका संशयास्पद ठरत आहे.