बार्शीटाकळी येथे मधमाशांचा भाविकांवर हल्ला : दोन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 05:42 PM2019-03-04T17:42:27+5:302019-03-04T17:42:46+5:30

बार्शिटाकळी (अकोला) : येथील श्री खोलेश्वर महाराज संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ४ मार्च रोजी घडली.

Honey bees attack on devotees at Barshitakali: two serious | बार्शीटाकळी येथे मधमाशांचा भाविकांवर हल्ला : दोन गंभीर

बार्शीटाकळी येथे मधमाशांचा भाविकांवर हल्ला : दोन गंभीर

googlenewsNext

बार्शिटाकळी (अकोला) : येथील श्री खोलेश्वर महाराज संस्थान येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याची घटना ४ मार्च रोजी घडली. यामध्ये ५० ते ६० भाविक जखमी झाले असून त्यातील दोन गंभीर जखमी आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त बार्शीटाकळी शहरासह परिसरातील भाविकांनी खोलेश्वर संस्थान येथे सोमवारी मोठी गर्दी केली होती. यावेळी मंदिरा शेजारी असलेल्या झाडावरील मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. या हल्ल्यात लहान मुलांसह ५० ते ६० महिला पुरुष जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्यामुळे भाविकांची एकच धावपळ उडाली होती. जखमींमध्ये संजय बळीराम इंगळे, आदीत्य देविदास वाट , ओम संतोष इंगळे ,आदित्य विनायक टेकाडे, दिलीप श्रीराम मोहकार, सुभाष सिंग बिसेनसिगं बेम, सुरेश बळीराम इंगळे, वैभव दिनकर माळवे, सुमन पांडूरंग करपे, सुमित विजय सिंग ठाकूर , विकास गजानन ठाकरे , व लक्ष्मण आदींसह इतर रुग्णांचा समावेश आहे. या रुग्णांना बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमीक उपचार करून पुढील उपचार करीता अकोला सर्वोपचार मध्ये हलविण्यात आले, तर किरकोळ जखमी झालेल्या काही रुग्णांन वर उपचार करण्यात आले. मात्र दुपार पर्यंत मधमाशांच्या हल्यात जखमी झालेल्यांची संख्या वाढतच असल्याने दर्शना करीता येत असलेल्यांना गावातील नागरिकांनी सुचित केले. त्यामुळे, भावीकांनी मंदीरावर येणे टाळले. बाशीर्टाकळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ महेश राठोड व डॉ श्याम राठोड , तसेच राहुल गवई व प्रशिक्षणार्थी डॉक्टारांनी जखमींवर प्राथमीक उपचार केले.

 

Web Title: Honey bees attack on devotees at Barshitakali: two serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.