अकाेला: अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुर्तिजापुर, अकोट व तेल्हारा तालुक्यातील हॉटेल व दुकानांची शुक्रवारी तपासणी केली़ या तपासणीत ज्या हाॅटेल व कीराणा दुकानांमध्ये त्रुटी आढळल्या अशा ९ हॉटेल व दुकानांदारावर दंडात्मक कारवाइ करण्यात आली़ त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ वसुल केला.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी मुर्तिजापुर, अकोट, तेल्हारा, तालुक्यातील हॉटेल व दुकानांची तपासणी केली. या तपासणीत हॉटेल व दुकानदारानी विहीत नोंदणी अथवा परवाना काढलेला नसल्याचे समाेर आले़ हॉटेल चालकांनी अन्न पदार्थावर बेस्ट बिफोर दिनांक नमुद केल्याचे आढळले नाही़ हॉटेल व दुकानांत अस्वच्छता आढळल्यामुळे हॉटेल मालक व दुकानदारांवर दंडात्मक कारवाइ करण्यात आली़ एकुण ९ हॉटेल मालक व दुकानदारांकडुन एकुण ३० हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाइ सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली.
जिल्हयातील अन्न व्यवसायिकांनी हॉटेल व दुकानात साफसफाई ठेवावी़ उपहार गृह, मिठाई दुकानादारानी अन्न पदार्थावर बेस्ट बिफोर दिनांक नमुद करणे बंधनकारक आहे़ त्यांनी या नियमांचे पालन करावे़नितीन नवलकार, अन्न सुरक्षा अधिकारी अकाेला़