हावडा-मुंबई विशेष गाडी आता आठवड्यातून तीन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:56 AM2020-09-15T10:56:40+5:302020-09-15T10:56:59+5:30
अप-व डाउन अशा चार गाड्या आता आठवड्यातून तीन दिवस अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
अकोला : अनलॉक-४ अंतगÊत लॉकडाऊन नियम शिथिल झाल्यानंतर विशेष रेल्वेगाड्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने आतापयÊंत आठवड्यातून एक दिवस धावणाºया मुंबई-हावडा-मुंबई व अहमदाबाद-हावडा-अहमदाबाद या विशेष रेल्वे गाड्यांच्या फेºया वाढविण्याचा निणÊय घेतला आहे. अप-व डाउन अशा चार गाड्या आता आठवड्यातून तीन दिवस अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
गाडी क्र. ०२८१० अप हावडा-मुंबई मेल ही विशेष गाडी २१ सप्टेंबरपासून आठवड्यातून दर सोमवार, बुधवार व शनिवार या दिवशी हावडा स्थानकावरून नियोजित वेळेवर प्रस्थान करून दुसºया दिवशी अथाÊत मंगळवार, गुरुवार व रविवारी सायंकाळी ६.०८ वाजता येईल व ६.१८ वाजता मुंबईकडे प्रयाण करेल.
गाडी क्र. ०२८०९ डाउन मुंबई-हावडा मेल ही गाडी मुंबई स्थानकावरून २३ सप्टेंबरपासून दर बुधवार, शुक्रवार आणि सोमवार या दिवशी मुंबई येथून प्रस्थान करीत दुसºया दिवशी अथाÊत गुरुवार, शनिवार व मंगळवारी सकाळी ६.०५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.
गाडी क्र - ०२८३४ अप हावडा-अहमदाबाद ही विशेष गाडी हावडा स्थानकावरून १५ सप्टेंबरपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल. ही गाडी दर बुधवार, शनिवार व सोमवारी अकोला स्थानकावर आपल्या नियोजित वेळेवर येईल. गाडी क्र - ०२८३४ डाउन अहमदाबाद-हावडा ही गाडी अहमदाबाद स्थानकावरून दर बुधवार, शुक्रवार आणि सोमवार या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल. ही गाडी अकोला स्थानकावर गुरुवार, शुक्रवार व मंगळवारी आपल्या नियोजित वेळेवर येईल.