लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकर्यांच्या कृषी पंपांची वीज कापाल तर खबरदार, असा इशारा आमदार बळीराम सिरस्कार यांनी महावितरणच्या अधिकार्यांना १५ नोव्हेंबर रोजी दिला. ते पातूर तालुक्यातील शेकडो शेतकर्यांच्या आक्रोश मोर्चात मार्गदर्शन करीत होते. भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी स्थानिक संभाजी चौकापासून पातूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी तालुका अध्यक्ष अँड. किरण सरदार, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभा अवचार, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, आसिफ खान, राजुमिया देशमुख, शोभा शेळके, दीपक इंगळे आदींनी यावेळी भाषणांमधून सरकारचे वाभाडे काढले आणि सरकारच्या धोरणानुसार शेतकरी कसा मरणासन्न अवस्थेत पोहोचला, ते सांगितले. यावेळी सरकारने फसवी कर्जमाफी थांबवून संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा करावा, संपूर्ण वीज बिल माफ करावे, सोयाबीनला पाच हजार, तुरीला सात हजार व कापसाला नऊ हजार असा शेतमालाच्या उत्पादन खर्चावर भाव मिळावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकरी घाम गाळून पिकवित असलेल्या शेतमालाची ऑनलाइन विक्री थांबविण्यात यावी, क्रीमी लेयरमधून ओबीसीमधील काही जाती वगळण्याची मागासवर्ग ओबीसी आयोगाने केलेली शिफारस रद्द करावी, जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते दुरुस्त करावेत, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करावी, त्याबरोबरच ग्रामीण भागातील लोकांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन आ. सिरस्कार यांनी तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांना सादर करून ते शासनापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.यावेळी कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभा अवचार, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला बालकल्याण सभापती देवका पातोंड, जि. प. सदस्य शोभा शेळके, आसिफ खान, राजूमिया देशमुख, शैलेंद्र सोनोने, सम्राट सुरवाडे, जीवन डिगे, विकास सदांशिव, जीवन उपर्वट, आकाश वाहुरवाघ, सुनील सदाशिव, किशोर तेलगोटे, अँड. किरण सरदार, सुनील पाटकर, सविता धाडसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कृषी पंपांचे कनेक्शन तोडाल तर खबरदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:09 AM
शिर्ला : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकर्यांच्या कृषी पंपांची वीज कापाल तर खबरदार, असा इशारा आमदार बळीराम सिरस्कार यांनी महावितरणच्या अधिकार्यांना १५ नोव्हेंबर रोजी दिला. ते पातूर तालुक्यातील शेकडो शेतकर्यांच्या आक्रोश मोर्चात मार्गदर्शन करीत होते.
ठळक मुद्देशेतकरी आक्रोश मोर्चात बळीराम सिरस्कारांनी दिला महावितरणला इशारा