आढावा बैठकीला दांडी मारल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:57 PM2019-02-03T12:57:29+5:302019-02-03T12:58:05+5:30

अकोला: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, पवित्र पोर्टलवरील कामाचा आढावा घेण्यासाठी ४ फेब्रुवारी यशदा पुणे येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना उपस्थित राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.

If skiping review meeting suspend action on educational officials! | आढावा बैठकीला दांडी मारल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

आढावा बैठकीला दांडी मारल्यास शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई!

Next


अकोला: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, पवित्र पोर्टलवरील कामाचा आढावा घेण्यासाठी ४ फेब्रुवारी यशदा पुणे येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना उपस्थित राहण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. या बैठकीला दांडी मारणाºया प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना तत्काळ निलंबित करण्याचा इशारा अवर सचिवांनी दिला आहे.
सध्या राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, खासगी अनुदानित शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दोन्ही विषयांसह पवित्र पोर्टलवरील माहितीचा आढावा शासनाचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव घेणार आहेत. या आढावा बैठकीला राज्यातील सर्वच प्राथमिक शिक्षणाधिकाºयांनी उपस्थित राहण्याचे फर्मानच राज्याच्या अवर सचिवांनी सोडले आहेत. सध्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर बिंदू नामावली अद्ययावत करण्यासोबतच रिक्त पदांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली, विषय शिक्षकांच्या नियुक्तीचे प्रकरण गाजत आहे. या महत्त्वाच्या विषयांचा आढावा ग्रामविकासाचे प्रधान सचिव घेणार आहेत. त्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना जिल्हा परिषदेची माध्यमनिहाय माहिती व इतर संबंधित माहिती घेऊन उपस्थित राहावे लागणार आहे. बैठकीकडे दुर्लक्ष करून दांडी मारणाºया शिक्षणाधिकाºयांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा अवर सचिव पी. एस. कांबळे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: If skiping review meeting suspend action on educational officials!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.