जलवाहिनीवर अवैध नळ जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:20 AM2021-04-23T04:20:37+5:302021-04-23T04:20:37+5:30
रस्त्यावर बांधकाम साहित्य अकोला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या खंडेलवाल महाविद्यालयाजवळ रस्त्यावर बांधकाम साहित्य पडून आहे. ...
रस्त्यावर बांधकाम साहित्य
अकोला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या खंडेलवाल महाविद्यालयाजवळ रस्त्यावर बांधकाम साहित्य पडून आहे. यामध्ये रेती, विटा, गिट्टीचा समावेश असून, अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे साहित्य मनपाने त्वरित जप्त करण्याची गरज आहे.
अनावश्यक बॅरिकेड हटवा!
अकोला : काेराेनाच्या सबबीखाली पाेलीस प्रशासनाने शहरातील प्रमुख चाैकांमध्ये बॅरिकेड उभारले. यामध्ये जय हिंद चाैक, गांधी रोडवर मुख्य चौकात तसेच खदान पाेलीस ठाणेनजीक बॅरिकेड लावले आहेत. या बॅरिकेडमुळे चारचाकी वाहनचालकांना अडथळा निर्माण हाेत आहे. ही बाब पाहता पाेलिसांनी अनावश्यक बॅरिकेड हटविण्याची मागणी हाेत आहे.
रेल्वे स्टेशन चाैकात अस्वच्छता
अकोला : शहरातील रेल्वे स्टेशन चाैकात साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येते. या चौकात मातीचे ढीग व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाच्या आराेग्य निरीक्षकांचे दुर्लक्ष हाेत आहे.
खड्डा ठरतोय जीवघेणा
अकोला : श्रीवास्तव चाैकातील कामगार कल्याण मंडळासमाेर जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हे पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.
'दररोज पाणीपुरवठा करावा'!
अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे. परंतु दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने अकाेलावासीयांमध्ये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग १ मधील नायगाव येथील रहिवाशांनी केली आहे.