जलवाहिनीवर अवैध नळजोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:14+5:302021-01-17T04:17:14+5:30
परमिट नसलेल्या ऑटाेमुळे वाहतुकीची कोंडी अकोला : शहरातील अत्यंत रहदारीच्या मार्गावर ऑटाेचालकांच्या मनमानीला ऊत आला आहे. सिटी काेतवाली, गांधी ...
परमिट नसलेल्या ऑटाेमुळे वाहतुकीची कोंडी
अकोला : शहरातील अत्यंत रहदारीच्या मार्गावर ऑटाेचालकांच्या मनमानीला ऊत आला आहे. सिटी काेतवाली, गांधी रोड, खुले नाट्यगृह आदी ठिकाणी थांबा नसताना मनमानीरीत्या भर चौकात ऑटाे उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. यामध्ये शहराचा परवाना नसलेल्या ऑटोंची संख्या लक्षणीय असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते.
रस्त्यावर बांधकाम साहित्य
अकोला : जुन्या शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या खंडेलवाल महाविद्यालयाजवळ तसेच चिंतामणीनगर ते साेपीनाथ मार्गावर बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून आहे. यामध्ये रेती, विटा, गिट्टीचा समावेश असून अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर साहित्य मनपाने त्वरित जप्त करण्याची गरज आहे.
अनावश्यक बॅरिकेड हटवा!
अकोला : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या गांधी रोडवर मुख्य चौकात पोलीस प्रशासनाने बॅरिकेड लावले. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खदाण पाेलीस ठाण्यानजीक बॅरिकेड लावले आहेत. या बॅरिकेडमुळे चारचाकी वाहनचालकांना अडथळा निर्माण हाेत आहे. ही बाब पाहता पाेलिसांनी अनावश्यक बॅरिकेड हटविण्याची मागणी हाेत आहे.
रेल्वे स्टेशन चाैकात अस्वच्छता
अकोला : शहरातील रेल्वे स्टेशन चाैकात साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येते. या चौकात मातीचे ढीग व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
खड्डा ठरतोय जीवघेणा
अकोला : अग्रसेन चाैकातील मुख्य रस्त्याच्या मधाेमध जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हे पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.
नागरिकांसाठी 'ओपन स्पेस' मोकळ्या करा!
अकाेला : शहरात ले-आउटचे निर्माण करताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ओपन स्पेस ठेवणे गरजेचे आहे. बहुतांश ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, लहान मुलांसाठी अशा खुल्या जागा विकसित करण्याची मागणी हाेत आहे. याकडे सत्तापक्षाचे दुर्लक्ष होत आहे.
पार्किंगची कोंडी कायम
अकोला : शहरात पार्किंगच्या जागेवर उभारलेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकरांची कुचंबणा हाेत आहे. प्रशासनाने ही समस्या दूर करण्याची गरज आहे. नागरिक त्यांची वाहने रस्त्यावर उभी ठेवत असल्याने वाहतुकीची काेंडी हाेत आहे. वाहतूक शाखा पाेलिसांच्या कारवाईमुळे वाहनधारक वैतागले आहे.
'दररोज पाणीपुरवठा करावा'!
अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे. परंतु, दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने अकाेलेकरांमध्ये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग १ मधील नायगाव येथील रहिवाशांनी केली आहे.