चिखलगावात अवैध दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:02+5:302020-12-09T04:14:02+5:30
थंडीचा जोर वाढल्याने आजार बळावले खानापूर: गत दिवसांपासून खानापूर परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. कडाक्याची थंडी पडत असल्याने, नागरिकांना ...
थंडीचा जोर वाढल्याने आजार बळावले
खानापूर: गत दिवसांपासून खानापूर परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. कडाक्याची थंडी पडत असल्याने, नागरिकांना शेकोटीसह ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच सर्दी, खोकला, ताप, दमा आजारांनी डोके वर काढले आहे.
रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा आंदोलन
बोरगाव मंजू: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. रस्त्याची महामार्ग प्राधिकरणाने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कपाशी पिकाचे सर्वेक्षण करण्याची मागणी
माना: परिसरात कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळी व बोंडसळचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. यंदाचे वर्ष नापिकीचे गेल्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकरी खचला आहे. बोंडअळी आलेल्या कपाशी पिकाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव, तरीही बेफिकिरी!
चोहोट्टा बाजार: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक मात्र बेफिकीर आहेत. आठवडी बाजारात गावाेगावचे नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. परंतु कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाहीत. ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस कर्मचारी ढिम्म आहेत. कारवाईसाठी कोणीही पुढे येत नाही.
वन्य प्राण्यांचा धुडगूस, हरभरा पीक धोक्यात
अडगाव: वन्य प्राणी शेतातील हरभरा पिकात धुडगूस घालून पीक उदध्वस्त करीत आहेत. हरभरा पिकामध्ये शिरून वन्य प्राणी पीक फस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वन्य प्राण्यांचा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मुख्य मार्गावरचे अतिक्रमण काढण्याची मागणी
अकोट: शहरातील अकोला नाकापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले. रस्त्यावर दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. नगर परिषदेने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची नागरिकांनी केली आहे.
पूर्णा नदीतून अवैध रेतीचे उत्खनन
म्हैसांग: परिसरातील कट्यार, वडद, कपिलेश्वर, वीरवाडा, म्हैसांग आदी गावांमधून जाणाऱ्या पूर्णा नदी पात्रातून रेती माफिया दिवसरात्र रेतीचे अवैध उत्खनन करीत आहेत. याकडे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.
हरभरा पिकाला पाणी देण्याची लगबग
आपातापा: मूग, उडीद, सोयाबीनच्या पिकाने धोका दिल्याने, यंदा शेतकऱ्यांना हरभरा पिकाकडून अपेक्षा आहेत. हरभरा पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी पूर्णा नदीतून, शेततळ्यांमधून पाणी देण्यावर देत आहेत. शेतांमध्ये स्प्रिंकलर लावलेले दिसून येत आहेत.
रानडुकरांपासून पिकांचे संरक्षण
पिंजर: कपाशी, हरभरा, तूर पिकांचे रानडूकर, हरिणांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता नवीन शक्कल लढविली आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील धुऱ्यांवर साड्यांचे कुंपण घातल्याचे चित्र परिसरात दिसत आहेत.