मूर्तिजापुरात गुटख्याचा अवैध साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 01:15 PM2020-09-25T13:15:41+5:302020-09-25T13:15:47+5:30
दुकानात २ लाख ७७ हजार ५७० रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचे ३२६ कट्टे आढळून आले.
मूर्तिजापूर : येथील स्टेशन विभागात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा एका दुकानात साठवून ठेवण्यात आला होता. शहर पोलिसांनी २३ सप्टेंबर रोजी रात्री दुकानात छापा घालून पावणेतीन लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळालेल्या माहितीनुसार स्टेशन विभागातील ओम जनरल व पान मसाला दुकानावर २३ सप्टेंबरच्या रात्री १० वाजताच्या दरम्यान पोलिसांनी छापा घातला. दुकानात २ लाख ७७ हजार ५७० रुपयांचा प्रतिबंधित गुटख्याचे ३२६ कट्टे आढळून आले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या तक्रारीनुसार स्थानिक सुभाष चौकात गजानन अशोक अग्रवाल हा ओम जनरल अॅन्ड पान सेंटर चालवितो. त्याच्या दुकानाची तपासणी केली असता, दुकानात शासनाने प्रतिबंधित सुगंधी गुटख्याची पाकिटे आढळून आली. या गुटख्याची किंमत २ लाख ७७ हजार ५७० रुपये आहे. पोलिसांनी अवैध गुटखा जप्त करुन आरोपीविरुद्ध भादंवि कलम १८८, २७२, २७३, सहकलम २६ (२) (४) ५९ अन्वये सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी गजानन अशोक अग्रवाल याला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक आशीष शिंदे, दीपक इंगळे, नमुवेल इंगळे, शिपाई रवी जाधव, सुरेश पांडे, शेख सलमान, चालक दुबे, शकुंतला कुलट यांनी केली.
फोटो: