ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केली जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्यांशी चर्चा महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकामार्फत तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्यांशी चर्चा करून ज्या गावांत पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकामार्फत सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामे करण्यासाठीच्या कामाला लागले. प्रशासकीय यंत्रणांनी तातडीने कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली.