पारस ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:26+5:302021-06-16T04:26:26+5:30

१५ व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत निधीतून २५ टक्के खर्चाची शासन मर्यादा असून ग्रामपंचायतीमार्फत गावात सेंटर उभारावे, असे शासनाचे ...

Inauguration of Kovid Center of Paras Gram Panchayat | पारस ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

पारस ग्रामपंचायतीच्या कोविड सेंटरचे उद्घाटन

Next

१५ व्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत निधीतून २५ टक्के खर्चाची शासन मर्यादा असून ग्रामपंचायतीमार्फत गावात सेंटर उभारावे, असे शासनाचे आदेश आहेत. त्या आदेशाचे पालन करून पारस ग्रामपंचायतीच्या वतीने पारस-बाळापूर रोडवरील संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूल येथे ३० खाटांचे कोविड सेंटर उभारले आहे. या सेंटरचे उद्घाटन आमदार नितीन देशमुख यांनी फीत कापून केले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषदेचे गटनेते गोपाल दातकर, बाळापूर तालुका शिवसेनाप्रमुख संजय शेळके, उपतालुका प्रमुख निलेश बिल्लेवार, पारस ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष साठे, सामाजिक कार्यकर्ते मो. जफर सेठ, सुभाष शे. धनोकार, दिल्लू ठाकूर, अनिरुद्ध देशमुख, उमेश उबाळे, आनंद बनचरे, अनंता कराळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन तायडे, वृक्षमित्र शिवशंकर कडू, नितीन लांडे, अजय राजनकर, दिनेश आंबिलकर, सोनू लांडेण, अन्वर अन्सारी, मुकेश लोळगे, आनंद हातोले, शे. अजहर आदींची उपस्थिती होती. (वा.प्र.)

फोटो:

Web Title: Inauguration of Kovid Center of Paras Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.