शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
3
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
4
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
5
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
6
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
7
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
8
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
9
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
10
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
11
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
12
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
13
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
15
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
16
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
17
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
20
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."

अकोल्यात रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 4:02 PM

रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे.

अकोला:  राज्याचे कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचा महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. अकोला येथे  सोमवार रोजी प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयाच्या आवारात, आर.डी.जी.महिला काँलेजसमोर, नेहरु पार्कच्या बाजुला, मूर्तीजापूर रोड अकोला येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जेष्ठ साहित्यीक डॉ. विठ्ठल वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, आत्माचे प्रकल्प उपसंचालक अजय कुलकर्णी, कृषी उपसंचालक अरुण वाघमारे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक ताराणीया, अकोला आत्मा समितीचे अध्यक्ष भरत काळमेघ, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गीते, तालुका कृषि अधिकारी दिनकर प्रधान तसेच आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विजय शेंगोकार, मंगेश झामरे, योगेश देशमुख, सचिन गायगोळ, वरुण दळवी, अर्चना पेठे, निशीका चोपडे यांची उपस्थिती होती. पावसाची रिपरिप सुरू झाली की रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. प्रेमाने, निगुतीने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरु झाला की, या रानभाज्या रानोमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. वर्षातून एकदाच येणारा रानमेवा म्हणजे खऱ्या अर्थाने सेंद्रीय अन्न होय. कोणतंही खत किंवा कीटकनाशक नाही, कोणतीही लागवड नाही. अशा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे.त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रानभाज्या विषयी ओळख व माहिती व्हावी याकरीता कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी शेतकरी गटाच्या माध्यमातून रानभाज्यांचे विक्री सुद्धा करण्यात आली. रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान असल्यामुळे तसेच संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्ठे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) याची सचित्र माहिती देण्यात आली. याद्वारे रानभाज्यांना ओळख मिळून त्यांची विक्रीव्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होईल. ग्राहकांना आरोग्यपुर्ण भाज्या उपलब्ध होण्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे विचार प्रगट करण्यात आले. यावेळी रानातील मेवा म्हणून, अंबाडी,चिवळी,केना,शेवगा, सुरण,करवंद,आघाडा.टरोटा,पिंपळ,भूई आवळा,करटोली, राजगुरा,वाघाटे,फांदीची भाजी,कुंजीर भाजी,चमकुराचे पाने,काटसावर,जिवतीचे फुलं व इतर प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी रास्त भावात उपलब्ध होती.

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र