पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 03:27 PM2019-09-09T15:27:30+5:302019-09-09T15:27:35+5:30

पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Increase the duration for crop loan restructuring | पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मुदत वाढ

पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मुदत वाढ

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत पुनर्घटनेसाठी पात्र असलेल्या २५ हजार ४९२ लाभार्थींपैकी जिल्ह्यातील ८ हजार २७४ शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेमार्फत १५ जुलै ते ३० जुलैपर्यंत पीक कर्ज वाटप पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात १४१ पीक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले होते. यात काही कारणामुळे अनेक शेतकºयांना इच्छा असूनही पीक कर्ज पुनर्गठन नाच्या योजनेचा लाभ मुदतीत घेता येऊ शकला नाही.
दरम्यान, आजमितीस अकोला जिल्ह्यांमध्ये १७,२१८ शेतक ºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन या वाढीव मुदतीत करता येऊ शकेल. यासाठी शेतकºयांनी लेखी संमती संबंधित बँकेला देणे गरजेचे आहे. सर्वात जास्त स्टेट बँक आॅफ इंडियाकडे ८ हजार लाभार्थी आहेत, तसेच सेंट्रल बँक आॅफ इंडिया यांच्यामार्फत ३ हजार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होऊ शकते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला यांच्यामार्फत २ हजार ९५५ तर बँक आॅफ महाराष्ट्र मार्फत १,२८४ शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होऊ शकते. आतापर्यंत पीक कर्जाच्या पुनर्गठनामध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्स व युनियन बँक आॅफ इंडिया यांनी उल्लेखनीय काम केल्याचे दिसून येत आहे.


मागील वर्षांमध्ये पीक कर्ज घेतलेल्या व काही कारणास्तव सदर पीक कर्जाची परतफेड करू न शकलेल्या या शेतक ºयांना जुन्या कर्जाचे पुनर्गठन केल्यास नवीन कर्ज वाटपसुद्धा मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांनी पीक कर्ज पुनर्गठन योजनेच्या या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा.
- डॉ. प्रवीण लोखंडे,
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला.

Web Title: Increase the duration for crop loan restructuring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.