प्रकल्पबाधित, स्थानिक उमेदवारांच्या राखीव जागेत वाढ करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:19 AM2021-09-25T04:19:21+5:302021-09-25T04:19:21+5:30
पारस : औष्णिक विद्युत केंद्रात महानिर्मितीतर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवाराची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. परंतु ...
पारस : औष्णिक विद्युत केंद्रात महानिर्मितीतर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवाराची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. परंतु प्रकल्पग्रस्त तथा स्थानिक उमेदवारांना २५ टक्के जागा देण्यात आल्या आहेत. प्रकल्पग्रस्त परिसरातील शिकाऊ उमेदवारांसाठी त्या कोट्यामध्ये वाढ करून त्याची मर्यादा ५० टक्के करावी, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव अभिलाश तायडे यांनी मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांमध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे सन २०१८पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. प्रक्रिया रद्द करून नव्या नियमांवलीसह पुन्हा प्रक्रिया लागू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबुभाई, मा. ग्रा. सदस्य रमेश तायडे, पवन गाडगे, गणेश लांडे, महेश तायडे, गौरव सुरे, मोहन वानखडे, राहुल राऊत, मयुर तायडे, महेश उमाळे, संतोष अंभोरे, राहील शेख यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.