गाेरक्षण राेडवर अतिक्रमण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:42+5:302020-12-23T04:15:42+5:30

कार्यमुक्त परिचारिकांना सेवेची प्रतीक्षा अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काेराेनाच्या उद्रेककाळात परिचारिकांची भरती करण्यात आली हाेती. काेराेनाचे रुग्ण कमी ...

Increased encroachment on the guard road | गाेरक्षण राेडवर अतिक्रमण वाढले

गाेरक्षण राेडवर अतिक्रमण वाढले

Next

कार्यमुक्त परिचारिकांना सेवेची प्रतीक्षा

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काेराेनाच्या उद्रेककाळात परिचारिकांची भरती करण्यात आली हाेती. काेराेनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर या परिचारिकांना कमी करण्यात आले. त्यांना पुन्हा सेवेची प्रतीक्षा असून, यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी निवेदन दिले आहे.

निवडणुकीची तयारी; तहसीलवर गर्दी वाढली

अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून, त्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी इच्छुक उमेदवारांची तहसील कार्यालयात गर्दी वाढली आहे.

शिपाईपद रद्द करू नका

अकोला : मान्यताप्राप्त खासगी शाळांमध्ये नवीन आकृतिबंध लागू करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी खासगी शाळा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अनिल फाटे, दीपक पाेटे, विष्णूभाऊ गाेंडचवर, गाैतम सिरसाट आदींनी यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

रस्ते, पाणी, नाल्यांचा बाेजवारा

अकोला : शहरालगतच्या प्रमुख १३ ग्रामपंचायती हद्दवाढ क्षेत्रात समाविष्ट भागात रस्ते, पाणीपुरवठा, नाल्यांची सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक रहिवाशांना दैनंदिन समस्यांचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते, तर पावसाळ्यात चिखल तुडवीत मार्ग काढावा लागताे.

सिमेंट रस्त्यांवर मातीचा भराव

अकोला : शहरात सिमेंट रस्ते निर्माण करण्यात आल्यानंतर त्यांच्या दाेन्ही बाजूंच्या कडा बुजविण्यासाठी मातीचा भराव टाकण्यात आला आहे.शहरात खाेलेश्वर ते पाेलीस मुख्यालय, पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय, टिळकराेड ते त्रिवेणेश्वर काॅम्प्लेक्स, नेहरू पार्क ते इन्कम टॅक्स चाैक ते संत तुकाराम चाैक आदींसह विविध भागांत प्रमुख रस्त्यांचे निर्माण करण्यात आले. काही ठिकाणी रस्त्यांच्या कडा बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आला आहे.

Web Title: Increased encroachment on the guard road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.