लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घुसर बसस्थानकावर पाणटपरी लावण्यावरून झालेल्या भानुदास ठाकरे हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच दंडही ठोठावला असून, याच हल्ल्यात गोपाल ठाकरे गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकरणातही याच आरोपींना प्रत्येक ी सात वर्षांची शिक्षा ठोठावली.घुसर बसस्थानकावर येथीलच रहिवासी गजानन जनार्दन पागृत व संतोष जनार्दन पागृत (३६) यांची पानटपरी वर्षानुवर्षांपासून होती. याच ठिकाणावर गोपाल ठाकरे यांनीही पाणटपरीचा व्यवसाय सुरू केला. ठाकरे यांनी पाणटपरी का टाकली, या कारणावरून संतोष पागृत, गजानन पागृत व गोपाल ठाकरे यांच्यात ३0 जुलै २0१४ रोजी हाणामारी झाली. ही हाणामारी सुरू असतानाच भानुदास ठाकरे हे वाद मिटविण्यासाठी गेले; मात्र संतोष पागृत व गजानन पागृत यांनी तलवार, चाकू व धारदार शस्त्रांनी भानुदास ठाकरे यांच्यावरच हल्ला चढविल्याने भानुदास ठाकरे यांचा मृत्यू झाला, तर गोपाल ठाकरे यांच्यावरही शस्त्राने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी गोपाल ठाकरे यांच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलिसांनी गजानन जनार्दन पागृत व संतोष जनार्दन पागृत यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३0२ आणि ३0७ नुसार गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासले; मात्र दोन साक्षीदार फितुर झाले. सात साक्षीदारांची साक्ष आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत कलम ३0२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोबतच दोन हजार रुपये दंड ठोठावला व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. कलम ३0७ अन्वये दोन्ही आरोपींना प्रत्येक ी सात वर्षांची शिक्षा ठोठावली. सोबतच दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी विधिज्ञ अँड. विनोद फाटे यांनी ठामपणे बाजू मांडली.
घुसर हत्याकांड; दोन आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:41 AM
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घुसर बसस्थानकावर पाणटपरी लावण्यावरून झालेल्या भानुदास ठाकरे हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच दंडही ठोठावला असून, याच हल्ल्यात गोपाल ठाकरे गंभीर जखमी झाले होते. त्या प्रकरणातही याच आरोपींना प्रत्येक ी सात वर्षांची शिक्षा ...
ठळक मुद्देघुसर बसस्थानकावर पाणटपरी लावण्यावरून झाली होती भानुदास ठाकरेची हत्याप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या न्यायालयाने मंगळवारी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली