गत काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅसमध्येही भरमसाठ मोठी दरवाढ झाली आहे, तसेच शेतीच्या मशागतीच्या जरा बरोबरच रासायनिक खताच्या दरातही भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक महागाईचा सामना करीत आहेत. खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य गृहिणी त्रस्त झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान ५० ते ८० रुपयांनी खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलाबरोबरच डाळी, कडधान्याचे दरही कडाडले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे.
-------------------
अशी वाढली महागाई
शेगदाणा तेल १५५ १७५
सोयाबीन तेल ११८ १६०
शेगदाणे १०० ११५
साखर ३८ ४०
साबुदाणा ५९ ७०
मसाले ८०० १०००
चहापूड २३० २७०
तूरडाळ ९० १००
मूगडाळ ९० ११५
उडीद डाळ १०० १००
हरभरा डाळ ७५ ८५
-------
सिलिंडर पोहोचले १,०००च्या घरात
गत काही दिवसांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. आता ग्राहकांना गॅस सिलिंडर प्रति ९०५ रुपयांमध्ये मिळत आहे. त्यामध्ये घरी आणण्याचा खर्च जोडल्यास संपूर्ण खर्च हा हजाराच्या घरात जात आहे.
-----------------
डाळीचे दर कडाडले असून, सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत. त्यामुळे काही जणांनी जेवणातून डाळ गायब केल्याचे दिसून येत आहे.
-------------------
तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च असा
खाद्य तेल १०० रुपये
धान्य ५०
शेगदाणे ३०
साखर १२
साबुदाणा ३०
मसाले ५०
चहापूड १०
तूरडाळ ३०
मूगडाळ ६०
उडीद डाळ १०
हरभरा डाळ ३०
पेट्रोल १५०
डिझेल १००
एकूण ६६०
-----------
घरातील दाळीबरोबरच गॅसचे दर वाढल्याने महिन्याचे बजेट कोलमडले आहे. जुळवाजुळव करताना महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे.
- कविता डोंगरे, गृहिणी,
--------------------
वाढत्या महागाईचा महिन्याचे बजेट कोलमडले असून, डाळीचे भाव वाढल्याने ताटामधून वरण गायब झाल्याचे चित्र आहे.
- सिंधू पवार, गृहीणी